शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिवळ्याधमक तोतापुरीने बाजार फुलला, कडधान्य, सरकी तेलाचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 12:43 IST

Market Kolhapur : कोल्हापूर फळमार्केटमध्ये तोतापुरी आंब्याची आवक वाढली असून बाजार समितीत रोज १५ टन आंब्याची आवक होत आहे. त्यामुळे पिवळ्याधमक तोतापुरी आंब्यानी फळमार्केट फुलून गेले आहे. भाजीपाल्याच्या दरात काहीसी घसरण झाली असून गवार, भेंडी, वरणा, दोडक्याचे दर कमी झाले आहेत. कडधान्य मार्केट स्थिर असून किरकोळ बाजारात सरकी तेल १५० रुपये किलोवर कायम आहे.

ठळक मुद्देपिवळ्याधमक तोतापुरीने बाजार फुललाभाजीपाल्याच्या दरात घसरण : कडधान्य, सरकी तेलाचे दर स्थिर

कोल्हापूर : कोल्हापूर फळमार्केटमध्ये तोतापुरी आंब्याची आवक वाढली असून बाजार समितीत रोज १५ टन आंब्याची आवक होत आहे. त्यामुळे पिवळ्याधमक तोतापुरी आंब्यानी फळमार्केट फुलून गेले आहे. भाजीपाल्याच्या दरात काहीसी घसरण झाली असून गवार, भेंडी, वरणा, दोडक्याचे दर कमी झाले आहेत. कडधान्य मार्केट स्थिर असून किरकोळ बाजारात सरकी तेल १५० रुपये किलोवर कायम आहे.फळमार्केटमध्ये सफरचंद, तोतापुरी आंबा, अननस, केळीची रेलचेल दिसत आहे. फॉरेन सफरचंदचे दर चढे असून किरकोळ बाजारात दोनशे रुपये किलो आहे. साधारणता २५ ते ३० रुपयाला एक फळ बसत असल्याने ग्राहक खरेदीसाठी फारसा उत्सुक दिसत नाही. तोतापुरी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने सगळीकडे आंबा पाहवयास मिळत आहे. पिवळाधमक आंबा ५ ते १५ रुपयांपर्यंत मिळत आहे.भाजीपाल्या मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक काहीसी वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात थोडी घसरण झाली आहे. कोबी, ढब्बू या भाज्या वगळता इतर भाज्यांचे दर तुनलेत कमी झाले आहेत. गवार, कारली, वरणा, दोडका, वाल, बिनीस या भाज्यांचे दर ३० ते ५० रुपयांपर्यंत आहेत. टोमॅटो, वांगी, प्लॉवरचे दर स्थिर आहेत.कडधान्य मार्केट स्थिर आहे. तूरडाळ ११०, हरभरा डाळ ७०, मूग डाळ ११०, मूग १०० रुपये प्रतिकिलोचा दर आहे. साखर ३५ रुपये, शाबू ६०, सरकी तेल १५० रुपयांवर स्थिर आहे. ज्वारीचे दर प्रतिप्रमाणे ३० ते ५० रुपये किलोपर्यंत आहेत. शेतीची कामे सुरू असल्याने ग्रामीण भागात कडधान्य मार्केटमध्ये शांतता आहे.कांदा, बटाट्याचे दर स्थिर असून दरात फारसा चढउतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा ५ ते २०, बटाटा १० ते १८ तर लसूण ५० ते १०० रुपये किलो आहे.पालक, पोकळा, कोथिंबीर घसरलीपालेभाज्यांची आवक थोडी वाढल्याने दर घसरले आहे. मेथीचे दर स्थिर असून पालक, पोकळा, कोथिंबीरचे दर एकदम खाली आले आहेत.

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्याkolhapurकोल्हापूर