शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके रोखली, संस्थाचालकांच्या वादात विद्यार्थी अडचणीत; चंदगड तालुक्यातील प्रकार

By समीर देशपांडे | Updated: June 19, 2023 12:10 IST

शैक्षणिक प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ही गुणपत्रके अत्यावश्यक असताना ती न देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल

समीर देशपांडेकोल्हापूर : दहावीचा निकाल लागून सोळा दिवस झाले तरी चंदगड तालुक्यातील दाटे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांची दहावीची गुणपत्रके अद्यापही देण्यात आलेली नाहीत. डिप्लोमासह अन्य शैक्षणिक प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ही गुणपत्रके अत्यावश्यक असताना ती न देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले आहेत.शारदा शिक्षण प्रसारक मंडळ यशवंतनगर या शिक्षण संस्थेची चंदगड तालुक्यात सात माध्यमिक शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालये आणि एक वरिष्ठ महाविद्यालय आहे. यातील दाटे येथील माध्यमिक विद्यालयातून यंदा दहावी परीक्षेला १५ विद्यार्थी बसले होते. त्यांचा ऑनलाइन निकाल २ जून रोजी त्यांना समजला आहे. मात्र, त्यानंतर अतिशय गरजेची असलेली गुणपत्रके त्यांना मिळालेली नाहीत. शिक्षण संस्थेचे सचिव जे. बी. पाटील आणि माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्यातील वादात एस.एस.सी. बोर्डाने ही गुणपत्रके दिलेली नसल्याचे सांगण्यात आले.याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी विभागीय सचिव डी. एस. पोवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्या संस्थांमध्ये वाद आहेत अशा संस्थांची यादी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून आम्हाला दरवर्षी प्राप्त होते. यातील कोणाला अधिकृतपणे गुणपत्रिका द्यावयाच्या आहेत याची माहिती माध्यमिक विभागाकडून आल्यानंतर खात्री करूनच आम्ही या गुणपत्रिका देतो. परंतु, या शाळेकडून अधिकृतपणे कोणीही आले नसल्यामुळे या गुणपत्रिका दिलेल्या नाहीत. माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आज, सोमवारी या विषयाची माहिती घेऊन त्यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले.

मुलांच्या भवितव्याशी खेळ कशासाठी?शिक्षण संस्थाचालकांचा वाद जरी असला तरी तो मुलांच्या भवितव्याशी खेळणारा नसावा. या शिक्षण संस्थेच्या अन्य माध्यमिक विद्यालयांच्या गुणपत्रिका मिळालेल्या असताना याच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका न मिळण्यात नेमका कोणी खोडा घातला, अशी विचारणा होत आहे.

आमचा आणि विरोधकांचा शिक्षण संस्थेत वाद आहे. परंतु, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होता कामा नये. सोमवारी कोल्हापूरमध्ये येऊन हा विषय संपवणार आहे. - जे. बी.पाटील, सचिव, शारदा शिक्षण प्रसारक मंडळ, यशवंतनगर 

शिक्षण संस्थेत आमचा काहीही वाद असला तरी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका देण्यापासून कोणीच कोणाला रोखलेले नाही. या गुणपत्रिका तातडीने मिळाव्यात. - भरमूआण्णा पाटील, माजी राज्यमंत्री

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावीStudentविद्यार्थीSchoolशाळा