विवाहितेचा छळ सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:42+5:302021-03-24T04:23:42+5:30
शहापूर : येथील एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू व सासऱ्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

विवाहितेचा छळ सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल
शहापूर : येथील एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू व सासऱ्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार भाग्यश्री सचिन वाघावकर (वय २७, रा. किर्लोस्करवाडी, जि. सांगली, सध्या रा. शहापूर) यांनी दिली आहे.
पती सचिन पोपटराव वाघावकर, सासू तारामती व सासरा पोपटराव (सर्व रा. किर्लोस्करवाडी), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, १ मे २०१४ ला भाग्यश्री हिचा सचिन याच्याशी विवाह झाला आहे. लग्न झाल्यानंतर वीस दिवसांनंतर ते ऑगस्ट २०२० पर्यंत सासरच्या लोकांकडून माहेराहून सोन्याचे दागिने, मानाची भांडी व तिजोरी आणण्यासाठी भाग्यश्री हिचा वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ केला, तसेच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.