विद्यापीठात गुरुवारपासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:43+5:302021-01-13T05:04:43+5:30
या कार्यक्रमांचे उद्घाटन मराठी अधी विभागात गुरुवारी सकाळी अकरा वाजता कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याहस्ते होईल. लेखक संवाद ...

विद्यापीठात गुरुवारपासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
या कार्यक्रमांचे उद्घाटन मराठी अधी विभागात गुरुवारी सकाळी अकरा वाजता कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याहस्ते होईल. लेखक संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक राजन गवस, अनिल मेहता, महादेव मोरे, मोहन पाटील, माया नारकर, कृष्णात खोत, किरण गुरव, नामदेव माळी, संपत मोरे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला जाणार आहे. सोमवारी (दि. १८) दुपारी साडेबारा वाजता विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सभागृहात पधारो मारो देस (विष्णू पावले), मराठी पोवाडा तीन भाग (डॉ. सयाजी गायकवाड) या ग्रंथांचे प्रकाशन डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्याहस्ते होईल. दि. २० जानेवारी रोजी ‘स्मरण अरुण कोलटकरांचे’ हा कार्यक्रम होणार असून त्यासाठी प्रा. श्रीकृष्ण कालगावकर, अरुण चव्हाण, अविनाश सप्रे यांचा सहभाग असणार आहे. दि. २८ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पंडित आवळीकर काव्य पुरस्कार वितरण केले जाणार आहे, अशी माहिती या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. नंदकुमार मोरे यांनी दिली.