देवचंदमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:17+5:302021-02-05T07:02:17+5:30
प्रतिमा पूजन प्राचार्य डॉ पी.एम. हेरेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नविजन कांबळे यांनी पाश्चात्त्य कवी वर्ड्सवर्थ ...

देवचंदमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात
प्रतिमा पूजन प्राचार्य डॉ पी.एम. हेरेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नविजन कांबळे यांनी पाश्चात्त्य कवी वर्ड्सवर्थ यांच्या काव्याच्या संकल्पनेबाबत ऊहापोह केला. मराठी भाषा संवर्धन करणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक प्रा.डॉ. रमेश साळुंखे यांनी केले. उपप्राचार्या प्रा.सौ. कांचन पाटील- बिरनाळे यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगून स्वरचित कविता सादर केल्या. यावेळी रोहिणी पवार, श्रुती पाटील या विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या, तर स्नेहल चव्हाण हिने सुनीताबाई या ललित लेखाचे अभिवाचन केले.
प्राचार्य डॉ. हेरेकर यांनी कथाकथन, काव्यवाचन, काव्य गायनाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. आशालता खोत व प्रा. विष्णू पाटील यांनी केले. यासाठी प्रा. कृष्णामाई कुंभार, प्रा. शिवाजी कुंभार यांनी परिश्रम घेतले.