मराठी भाषा जगातील सर्वोत्तम भाषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:08+5:302021-02-05T07:03:08+5:30
आजरा : मराठी भाषा ही जगातील एक सर्वोत्तम भाषा असून, तिला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी आशा ...

मराठी भाषा जगातील सर्वोत्तम भाषा
आजरा : मराठी भाषा ही जगातील एक सर्वोत्तम भाषा असून, तिला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी आशा जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे यांनी व्यक्त केली. आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्यावतीने दिनांक १४ ते २८ जानेवारी यादरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या पंधरवड्याच्या सांगता समारंभात डॉक्टर देशपांडे बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी होते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी विभागाने आयोजित केलेल्या घोषवाक्य स्पर्धा, निबंध स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा आणि काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. घोषवाक्य स्पर्धेत निशा नरके, स्वाती डोंगरे, संस्कृती परीट आणि सायली झित्रे, निबंध स्पर्धेत रोहिणी गोविलकर, अक्षता परीट, स्नेहल डोंगरे, तनुजा कुंभार आणि प्रज्ञा कांबळे फोटोग्राफी स्पर्धेत रोहन पाटील, पार्थ तावडे, रेवती जांभळे, मयूरी पाटील आणि निशा नरके, तर ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेत सोनम देवडकर, संकेत तेजम, अक्षता परीट, रेवती जांभळे आणि स्नेहल डोंगरे यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. या स्पर्धांसाठी प्रा. संदीप देसाई, प्रा. आप्पासो बुडके, डॉ. अशोक बाचुळकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी संस्थेचे सचिव रमेश कुरुणकर, प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक सादळे, उपप्राचार्य प्रा. राजीव टोपले, प्रा. रूपाली फोंडेकर उपस्थित होते. प्रा. सुषमा पारकर यांनी स्वागत केले. प्रा. विनायक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वैशाली देसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुवर्णा धामणेकर यांनी आभार मानले.
फोटोकॅप्शन- मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना अशोक चराटी. शेजारी रमेश कुरुणकर, डॉ. अनिल देशपांडे.