शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: कोल्हापुरात शिवाजी पुलावर रास्ता रोको; आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 11:56 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक

कोल्हापूर : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. यामुद्द्यावरून आता राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज पासून आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांबाबत मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी बसले आहेत.संभाजीराजेंच्या या भूमिकेला राज्यातील विविध जिल्ह्यांतून समर्थन मिळत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज, शनिवार पासून दसरा चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.दरम्यान, आंदोलकांनी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुल येथे रास्ता रोको केला. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी शिवाजी पुलावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावरुन मराठा बांधवांनी याठिकाणी रास्ता रोको केला.दरम्यान, राज्य शासनाने याआधीच या आंदोलनाची दखल घेतल काल, शुक्रवारी मोठा निर्णय घेतला.  मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची नियुक्तीमराठा समाजासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीला गती मिळेल.

या आहेत मागण्या

  • ‘सारथी’ संस्थेचे काम पूर्णपणे ठप्प असून त्यांना सगळ्या सुविधा देऊन कामकाजाला गती द्यावी.
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ नेमा.
  • मराठा आरक्षणानंतर नोकरी मिळाल्यांच्या नेमणुका रद्द् केल्या आहेत. त्यांन पुन्हा सेवेत घ्या.
  • मराठा आरक्षणासाठी हुत्मामा झालेल्या ४० जणांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीत घ्या.
  • कोपर्डी येथील प्रकरणाची सुनावणी गतीने घ्या.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणPoliceपोलिस