शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात आज धरणे, आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 13:05 IST

''पालकमंत्री बोलका पोपट; काका पुतण्या का बोलत नाहीत?''

कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी सकल मराठा समाजातर्फे आज, सोमवारी येथील पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजता एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय हिंदू एकताच्या कार्यालयातील बैठकीत झाला. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देसाई, ॲड. महादेवराव आडगुळे, ॲड. शिवाजीराव राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.ॲड. देसाई म्हणाले, मराठा आरक्षणासाठीआंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढवत नेऊ. कोणाचाही जीव स्वस्त नाही. यामुळे सोमवारपासून ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांनी उपोषणाचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा. त्याऐवजी पापाची तिकटी येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करू. आरक्षणासाठी कायद्याची लढाई लढावी लागणार आहे. यासाठी विधी परिषद घेऊ.ॲड. आडगुळे म्हणाले, जरांगे-पाटील यांनी सर्वच मराठ्यांना कुणबीचे दाखले द्यावेत, अशी मागणी केली आहे. याउलट धनगर समाज, ओबीसी समाजही आरक्षणासाठी आंदोलन करीत आहे. यामुळे शासन गोंधळलेले आहे. बोळवण करीत आहे. पन्नास टक्क्यांवर दिले गेलेले आरक्षण टिकत नाही. यामुळे घटना दुरुस्ती करून ही मर्यादा उठवली पाहिजे. शासनाने आरक्षणप्रश्नी जरांगे पाटील यांना मुदत दिली आहे. त्या मुदतीची वाट पाहूया. मुदतीनंतर आरक्षण न दिल्यास लढा व्यापक करू.शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी मुश्रीफ यांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. मात्र, बैठक झाली नाही. कोणताही मंत्री असो तो समाजाला फसवण्याचे काम करीत आहे. मराठा मंत्रीही मराठ्यांना विसरले आहेत. आरक्षण देण्याची त्यांची मानसिकता नाही. भडकवण्याचे, फसविण्याचे काम ते करीत आहेत. त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.

विजय देवणे म्हणाले, अजित पवार यांची गाडी अडवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मुश्रीफ यांनी आश्वासन देऊन वेळाकाढूपणा केला आहे. यामुळे मराठा समाजाने मंत्र्यांना जाब विचारण्याची गरज आहे.ॲड. शिवाजीराव राणे म्हणाले, सेक्शन ११ वर जोर देऊया. आरक्षणप्रश्नी शासनाने जरांगे-पाटील यांना आश्वासन दिले आहे. ते पाळले नाही तर दुप्पट वेगाने आंदोलन करू. कायदेशीर आणि लोक आंदोलनातून आरक्षणासाठी शासनावर दबाव वाढवू. आजपर्यंत कोणत्याही पुढाऱ्याने आरक्षण दिले नाही. यापुढेही लवकर मिळेल असे वाटत नाही. पक्ष, पुढाऱ्यावर विश्वास ठेवायला नको. लढत राहू. आंदोलनाची धार वाढवत नेत आरक्षणासाठी कोल्हापुरात मंत्रिमंडळाची बैठक घेण्यास भाग पाडू.

बाबा पार्टे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणप्रश्नी बैठक घेतो असे सांगून फसवले आहे. पालकमंत्री, मुश्रीफ यांनी गोड बोलून फसवले आहे. आता जो फसवेल त्याच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे.अनिल घाटगे, किशोर घाटगे, दिलीप देसाई, ॲड. बाबा इंदूलकर यांची भाषणे झाली. बैठकीस के. के. सासवडे, ॲड. अजित माेहिते, वैशाली महाडिक, आर. के. पोवार, ॲड. गिरीश खडके आदी उपस्थित होते.काका पुतण्या का बोलत नाहीत ?रविकिरण इंगवले म्हणाले, आरक्षणाच्या विषयात सगळेच नेते एका माळेचे मणी आहेत. भाजप, शिवसेनेचे सरकार असताना आरक्षण दिले. ते टिकले नाही. पण त्यांनी दिले तरी. मात्र आरक्षणावर काका, पुतण्या का बोलत नाहीत ?

पालकमंत्री बोलका पोपटजयकुमार शिंदे यांनी आरक्षणप्रश्नी पालकमंत्री दीपक केसरकर काहीही करीत नाहीत. ते बोलका पोपट आहेत, अशी टीका केली. रंकाळा, अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी निधी आणून विकास करीत असल्याचे सांगूनही ते फसवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन