शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

Kolhapur- मराठा आरक्षण: हुपरीत 'मराठा क्रांती'च्यावतीने अर्धनग्न आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 15:17 IST

तानाजी घोरपडे हुपरी : अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व ...

तानाजी घोरपडेहुपरी : अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व कुणबी दाखला वंशावळीसाठी निजामशाही पुरावे मागणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज शनिवार, हुपरी (ता. हातकणंगले ) येथे 'मराठा क्रांती'च्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत यापुढेही विविध प्रकारची उग्र स्वरूपाची आंदोलने करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जुने बस स्थानक चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध केला. मराठा समाजाचे आरक्षणाबाबत सुरू असणारे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शासन प्रयत्न करीत असुन एक मराठा काय करू शकतो हे जालना येथील आंदोलनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करीत आंदोलक अर्धनग्न झाले. शांततेच्या मार्गाने सुरू असणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या घटनेचाही यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. तसेच जालना येथील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.या आंदोलनात विनायक विभूते, जयराम गायकवाड, राजेंद्र पाटील, सात्ताप्पा  गायकवाड, सुरज कदम, विशाल चव्हाण, अमर माने, संताजी देसाई, प्रताप जाधव , नितीन काकडे, वैभव लायकर, राजू साळूखे, अमित गायकवाड, धनाजी शिंदे, सूर्यकांत रावण , संभाजी काटकर, बाळासाहेब तांदळे, लखन शेलार, सागर मेथे, बंडा काकडे, नितीन काटकर, सयाजी देसाई आदींनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण