मराठा आंदोलनात दोघांच्या सोन्याच्या चेन अज्ञाताने चोरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST2021-06-17T04:18:14+5:302021-06-17T04:18:14+5:30

कोल्हापूर : मराठा समाज आरक्षण मूक आंदोलनासाठी कोल्हापुरात नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळी आलेल्या कागलमधील दोघा कार्यकर्त्यांच्या ...

In the Maratha movement, the gold chains of the two were stolen by unknown persons | मराठा आंदोलनात दोघांच्या सोन्याच्या चेन अज्ञाताने चोरल्या

मराठा आंदोलनात दोघांच्या सोन्याच्या चेन अज्ञाताने चोरल्या

कोल्हापूर : मराठा समाज आरक्षण मूक आंदोलनासाठी कोल्हापुरात नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळी आलेल्या कागलमधील दोघा कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात १३ ग्रॅम वजनाची व १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने चोरल्याच्या तक्रारी रात्री उशिरा दाखल झाल्या. दरम्यान, या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

कोल्हापुरातील ऐतिहासिक नर्सरी बागेत मराठा आरक्षण आंदोलनाची हाक देण्यात आल्याने बुधवारी मूक आंदोलन होते. त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजाचे कार्यकर्ते आंदोलनासाठी आले होते. यावेळी होणाऱ्या गर्दीचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी दोघा कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसडा मारून चोरून नेल्या. याबाबत सतीश तुकाराम पोवार (वय ३४, रा. कोष्टी गल्ली, कागल) याने आपल्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची ५२ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन तर अजित रामराव इंगळे (४८, रा. कोष्टी गल्ली, कागल) यानेही आपल्या गळ्यातील १० ग्रॅमची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन अज्ञाताने चोरल्याची तक्रार पोलिसांत दिली. दरम्यान, घटनेनंतर काही वेळातच स्थानिक गुन्हे अन्वेषण व लक्ष्मीपुरी पोलिसांनी काही संशयित युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांपैकी दोघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

Web Title: In the Maratha movement, the gold chains of the two were stolen by unknown persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.