शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha : कोल्हापूर : मराठा वसतिगृहाबाबतची पालकमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 18:28 IST

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात सुरू करण्याबाबतची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली मुदत उलटली आहे. राज्य शासनातर्फे मार्गदर्शक सूचना उशिरा मिळाल्याने वसतिगृह चालविण्यासाठी इच्छुक संस्थांच्या अर्ज मागणीची प्रक्रिया दि. २४ जुलैपासून सुरू झाली आहे.

ठळक मुद्देमराठा वसतिगृहाबाबतची पालकमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटलीविद्यार्थ्यांना प्रतीक्षा; संस्थांकडून अर्जांची मागणी

कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात सुरू करण्याबाबतची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली मुदत उलटली आहे. राज्य शासनातर्फे मार्गदर्शक सूचना उशिरा मिळाल्याने वसतिगृह चालविण्यासाठी इच्छुक संस्थांच्या अर्ज मागणीची प्रक्रिया दि. २४ जुलैपासून सुरू झाली आहे. बहुतांश महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.

कोल्हापुरातील विचारेमाळ येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीची दुरुस्ती करून वसतिगृहासाठी इमारत तयार केली. मराठा समाजातील ७२ विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय या वसतिगृहामध्ये होणार आहे. या वसतिगृहाची पाहणी पालकमंत्री पाटील यांनी दि. २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त केली. त्यावेळी त्यांनी या वसतिगृहाचे व्यवस्थापन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जाईल.

दि. २६ जुलैपर्यंत या वसतिगृहामध्ये मुले प्रत्यक्षपणे राहण्यास येतील, अशी व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून वसतिगृहासाठी विद्यार्थ्यांच्या नावनोेंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत ५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मात्र, वसतिगृह व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी संस्था नियुक्ती करण्याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना मिळण्यास विलंब झाला; त्यामुळे नोंदणीकृत संस्थांकडून अर्र्ज मागविण्याची प्रक्रिया गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शिष्यवृत्तीपाठोपाठ आता वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विलंब होत असल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

नोंदणीकृत संस्थांना सोमवारपर्यंत मुदतकोल्हापुरातील विचारेमाळ येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. या वसतिगृहाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, तर सदस्य सचिवपदी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांची नियुक्ती शासनाने केली आहे.

संबंधित वसतिगृह चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदस्य सचिवांकडे नोंदणीकृत संस्थांनी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार (दि. ३०) पर्यंत आहे. दरम्यान, किती संस्थांचे अर्ज दाखल झाले, वसतिगृहाची सुरुवात कधीपासून होणार, याची माहिती जाणून घेण्यासाठी सदस्य सचिव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.

 

राज्य सरकारने मराठा समाजासाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत अशा योजना जाहीर केल्या; पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी योग्य कार्यवाही केली नाही. त्यामुळे संबंधित योजना फसव्या ठरत आहेत. प्रत्येक महाविद्यालयात योग्य स्वरूपातील शासकीय आदेश पोहोचलले नाहीत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह योग्य पद्धतीने आणि किमान १० आॅगस्टपर्यंत तरी सुरू करावे.- ऋतुराज माने, शहराध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटना 

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर