Maratha Kranti Morcha : कोल्हापूर : मुंडन अन् शंखध्वनी करून सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 17:25 IST2018-07-27T17:22:27+5:302018-07-27T17:25:34+5:30
मराठा आरक्षणासाठी सरकारकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत शुक्रवारी उदय लाड, नंदकुमार सुतार, गणेश सुतार यांनी मुंडण करून घेत राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार शंखध्वनी करून तीव्र संताप व्यक्त केला. दसरा चौकात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला कोकण पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक राजीव जाधव, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे आदी उपस्थित होते.
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सरकारकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत शुक्रवारी उदय लाड, नंदकुमार सुतार, गणेश सुतार यांनी मुंडण करून घेत राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार शंखध्वनी करून तीव्र संताप व्यक्त केला. दसरा चौकात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.
शुक्रवारी चौथ्या दिवशी आमदार, माजी आमदार यांच्यासह विविध पक्ष, संघटनांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार मालोजीराजे, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक राजू आवळे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय करजगार, अभिजित राऊत, मंदार पाटील, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, संजय शेटे, दक्षिण भारत जैन सभेतर्फे सुरेश रोटे, विजयकुमार शेट्टी, सूर्यकांत पाटील, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाचे अध्यक्ष अशोक राबाडे, नितीन खाडे, अशोक कदम, दीपक घोडके, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष निवास साळोखे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.
दरम्यान आंदोलनस्थळी मराठा क्रांती मोर्चाचे उदय लाड, गणेश सुतार व नंदकुमार सुतार यांनी मुंडण करून घेऊन सरकारचा निषेध व्यक्त केला. तर उपस्थित मराठा बांधवांनी शंखध्वनी करत सरकारबद्दल आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी ‘एक मराठा...लाख मराठा...’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत मराठा बांधवांनी परिसर दणाणून सोडला.
..तर आम्हीही राजीनामा देऊ : हसन मुश्रीफ
मराठा आरक्षणाचा प्रश्न आमदारांच्या राजीनाम्याने सुटणार असेल तर आमचीही तयारी आहे; परंतु मुख्य प्रश्न हा तत्काळ आरक्षण देण्याचा आहे, त्यामुळे ते तातडीने देण्याची गरज आहे, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.