शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha पोवाड्यातून निर्धार ; आरक्षण घेणार माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 16:06 IST

बुधवारी सकाळी आंदोलनस्थळी शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी मराठा आरक्षणाबाबतचा पोवाडा सादर केला. ‘मराठा आरक्षण घेणार माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा’ अशा शब्दांत मराठा समाजाचा निर्धार व्यक्त केला. त्यांना शाहीर पापालाल नायकवडी, युवराज पुजारी, शिवाजी लांडगे, स्वराज नायकवडी, भार्गव कांबळे, बापूसाहेब साळोखे यांनी साथ दिली.

ठळक मुद्दे पोवाड्यातून निर्धार ; मराठा आरक्षण घेणार माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धराविविध संघटनांचा पाठिंबा; ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस

कोल्हापूर : ‘मराठा आरक्षण घेणार माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा’, असा शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर करून, तर राष्ट्रवादी, युवासेना, निवृत्त पोलिस अधिकारी कल्याणकारी संघटना अशा विविध संस्था, संघटनांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला बुधवारी पाठिंबा दिला.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी दसरा चौक येथे सकल मराठा ठोक मोर्चाने मंगळवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

बुधवारी सकाळी आंदोलनस्थळी शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी मराठा आरक्षणाबाबतचा पोवाडा सादर केला. ‘मराठा आरक्षण घेणार माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा’ अशा शब्दांत मराठा समाजाचा निर्धार व्यक्त केला. त्यांना शाहीर पापालाल नायकवडी, युवराज पुजारी, शिवाजी लांडगे, स्वराज नायकवडी, भार्गव कांबळे, बापूसाहेब साळोखे यांनी साथ दिली.

युवासेना, शिवसेनेचे ऋतुराज क्षीरसागर, पदमाकर कापसे, दिपक गौड, तुकाराम साळोखे, आदींनी भेट देवून पाठिंबा दिला. त्यांनी ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर माजी आमदार पी. एन. पाटील, निवृत पोलिस अधिकारी कल्याणकारी संघटनेचे मदन चव्हाण, प्रभाकर पाटील, पी. जी. मांडरे, बी. बी. पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला.

कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. त्यासह ‘राष्ट्रवादी’चे पदाधिकारी, कार्यकर्ते  गुरूवारी या ठिय्या आंदोलनात सहभागी होतील असे सांगितले. यावेळी जहिदा मुजावर, अनिल घाटगे यांच्यासह नगरसेवक आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर