शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

नवे विघ्न... १५ व्या वित्त आयोगाचा निधी थकला; कोल्हापूर महापालिकेत अनेकांचे पगार, मानधन थकले

By भारत चव्हाण | Updated: November 20, 2025 17:53 IST

स्वनिधीतून निधी देणेही अशक्य

भारत चव्हाणकोल्हापूर : राज्य सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगामधून गेल्या दोन वर्षांपासून महानगरपालिकेला देय असणारा निधीच मिळालेला नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी, चालकांचे पगार, डॉग कॅचर, श्वानांवर निर्बीजीकरण करणारे डॉक्टर्स, नालेसफाई केलेल्या जेसीबी, ट्रॅक्टर चालकांची तसेच टीपर दुरुस्ती करणाऱ्या कंपन्यांची बिले थकल्यामुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम होऊ लागला आहे.महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. अशावेळी राज्य सरकारकडून १५ व्या वित्त आयोगातून प्रत्येक वर्षी महापालिकेला मिळणारा १० ते १२ कोटींचा निधी हा मोठा आधार ठरला होता. त्यातून दैनंदिन कचरा उठाव करणाऱ्या टिपरचालकांचा पगार, टिपरची देखभाल दुरुस्ती, त्यांचे डिझेल - सीएनजीचा खर्च, कचरा उठावासाठी भाडेतत्त्वावर घेतलेले ट्रॅक्टर, जेसीबी, प्रत्येक वर्षी शहरातील नालेसफाईसाठी भाडेतत्त्वावर घेतले जाणारे जेसीबी, ट्रॅक्टर यांची बिले भागविली जात होती. एवढेच काय तर भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, श्वानांना पकडणारे डॉग कॅचर, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधनही दिले जात होते.गेल्या दोन वर्षांपासून पंधराव्या वित्त आयोगाचा निधीच महापालिकेला मिळालेला नाही. त्यामुळे सगळ्यांचीच सात-आठ महिन्यांची बिले थकली आहेत. अनेकांचे पगार, मानधन थकले आहेत. देणेकरी महापालिकेच्या दारात रोज येऊन बिलांची, पगारांची, मानधनाची मागणी करू लागले आहेत. मागतानाही आता त्यांना कमीपणा वाटायला लागला आहे. रोज अपेक्षेने लोक दारात येतात, पण पैसे नसल्याने आश्वासनापलीकडे त्यांना काहीही मिळत नाही. आरोग्य सेवेत घेतलेल्या ट्रॅक्टरचे सात महिने बिल थकले आहे. श्वानांचे निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर, डॉग कॅचर यांचे आठ महिन्यांचे मानधन थकले आहे.किती दिवस वाट पाहायची?भटक्या श्वानांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर आणि डॉग कॅचरना मानधन मिळाले नसल्याने त्यांनी कामात हात आखडता घेतला आहे. दैनंदिन कामावर परिणाम होऊ लागला आहे. पूर्ण क्षमतेने त्यांच्याकडून काम होत नाही. महापालिकेचे अधिकारीही त्यांना कामाचा आग्रह धरू शकलेले नाहीत. एक तर कमी मानधनात काम करायचे आणि तेही सात-आठ महिने मिळणार नसेल तर त्यांना कामे सांगण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही.

स्वनिधीतून निधी देणेही अशक्यथकलेली बिले, मानधन याची रक्कम महापालिकेच्या स्वनिधीतून उपलब्ध होईल तसे वाटप करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. परंतु, पालिकेची आर्थिक स्थितीच अत्यंत खराब असल्याने त्यावरही मर्यादा येत आहेत.

स्मशानात शेणी घ्यायला पैसे नाहीतशहरातील चार स्मशानभूमीकडे शेणी, लाकडे घ्यायला पैसे उपलब्ध झालेले नाहीत. घेतलेल्या शेणींची बिले देण्यातही अडचण आली आहे. त्यामुळेच स्मशानभूमीला शेणींचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगण्यात येते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Corporation Faces Financial Crunch Due to Delayed Funds

Web Summary : Kolhapur Municipal Corporation struggles as 15th Finance Commission funds are delayed. Salaries and payments are pending for sanitation workers, dog catchers, and other essential service providers, impacting public health services. The corporation faces severe financial strain.