शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Kolhapur: बांधकाम विभागची अनेक बोगस कामे होणार उघड; रस्ते, गटारांच्या कामांची छाननी गरजेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 14:02 IST

अधिकाऱ्यांना दुर्लक्ष भोवण्याची चिन्हे

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग यांच्याकडून जी कामे केली जातात ती फक्त लोकप्रतिनिधी, विभागांचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांनाच समजतात. गावात विकासकामाच्या आड यायला नको म्हणून अनेकदा ग्रामस्थही अशा कामांच्या खोलात जात नाहीत. त्यामुळे कागल, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील अनेक कामे बोगस झाली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळेच दीपक कुराडे यांनी मागवलेल्या माहितीमधून काही संशयास्पद बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे.मंत्री, खासदार, आमदार, नेते यांना ही कामे करा म्हणून जी निवेदने दिली जातात त्यातील मागणी अनेकदा ठेकेदारांकडूनही आलेली असते. मग ती मागणी मंजूर केली जाते. पाटील यांच्या घरापासून ते चव्हाण यांच्या घरापर्यंत अशा पद्धतीने निविदा काढली जाते. ती कोणाला द्यायची हे देखील लोकप्रतिनिधींना ठरवलेले असते. इथे सामंजस्य जोपासत फारसे कोणी कोणाच्या आडवे जात नाही. ठेका दिला जातो. अनेकदा जमेल तसे काम केले जाते. अधिकाऱ्यांच्या भेटी होतात. काम झाल्याचा दाखला दिला जातो. बिल काढले जाते.सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषदेचा बांधकाम विभागाच्यावतीने कधीही कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकल्याचे जाहीर केले जात नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तर आपण फक्त मंत्री, खासदार आणि आमदार यांनाच बांधिल असल्यासारखे वागत असतात. नेते आणि ठेकेदार यांच्याविरोधात कडक भूमिका घेण्याऐवजी तीन वर्षासाठी कशाला विरोध पत्करा म्हणून कोणीही अधिकारी ठोस भूमिका घेत नाहीत. त्यामुळेच निविदेतील कामापेक्षा कमी काम करून, दर्जाहीन काम करून पैसे उकळण्याची वृत्ती वाढली आहे. दीपक कुराडे यांनी माहितीच्या अधिकारातून मागवलेल्या माहितीमुळे आता पुन्हा या सगळ्याची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

अधिकाऱ्यांना दुर्लक्ष भोवण्याची चिन्हेकागल विधानसभा मतदारसंघातील ठेकेदारांची मोठी लॉबी असून त्यांचा अधिकाऱ्यांवर मोठा दबाव असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे यातील अनेक कामे संशयास्पद असल्याची चर्चा असून याच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कुराडे यांनी ‘गड्ड्या’लाच हात घातल्याने खळबळ उडाली आहे. कागल तालुक्यातील एका पक्षाचा पदाधिकारी असलेल्या ठेकेदाराने तर तिथल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्याची सही आपणच मारून आणली होती. अखेर त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले. परंतु नंतर त्याला पुन्हा यादीतून बाहेर काढण्यात आले. हे कोणामुळे झाले हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

टक्केवारी ठरलेलीकाम मंजूर झाल्यापासून ते बिल ऑनलाईन जमा होईपर्यंत कोणाला किती द्यायचे याचे दर निश्चित आहेत. मध्यंतरी या टक्केवारीत अधिकाऱ्यांनी वाढ केल्याने याबाबत ठेकेदारांच्या विनंतीनुसार ‘साहेबां’नी शासकीय विश्रामगृहावर बैठकही घेतली होती. त्यामुळे एवढ्या कोटीची कामे मंजूर करून आणल्याचा भला मोठा फलक लावला की यातील किती टक्के कोणाला याचा हिशेब सर्वसामान्य माणसालाही पाठ झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद