शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Kolhapur: केवळ पाच हजारांत बना बांधकाम कामगार; बडे शेतकरी, श्रीमंत लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:55 IST

खरा बांधकाम कामगार योजनेपासून दुरावत चालला

दत्ता बिडकरहातकणंगले : पाच हजार द्या आणि बांधकाम कामगार व्हा. इंजिनिअरच्या ९० दिवसांच्या कामाचा बोगस दाखला घ्या, बांधकाम कामगार बना, असा फंडा कामगार नोंदणीमध्ये सुरू आहे. चार-पाच एकरांचा शेतकरी आणि लाखो रुपयाच्या बंगल्याचा मालक, खासगी नोकरदार मंडळींपासून अनेकजण एजंटांच्या कृपेने थेट बांधकाम कामगार बनत असल्याने एजंट, इंजिनिअर आणि कामगार कार्यालयाच्या साखळीने जिल्ह्यात बांधकाम कामगार बनण्याचे पेव फुटले आहे. त्यामुळे खरा बांधकाम कामगार योजनेपासून दुरावत चालला आहे.ज्याने कधी विट, दगड, सिमेंटच्या कामाला हात लावला नाही. कामाची साधी सवय नाही अशा व्यक्तीला बांधकाम कामगाराची नोंदणी सहज मिळत आहे. बांधकाम कामगाराने ९० दिवस काम केल्याचा दाखला योजनेसाठी आवश्यक असतो. असा दाखला देण्यासाठी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकामकडील परवानाधारक इंजिनिअर हजार-बाराशेचा ढपला पाडत आहेत. एजंट आणि त्यांचे पाठीराखे गावोगावी नोंदणीसाठी जनजागृती करत आहेत. एजंटांच्या भरमसाठ मागणीला कंटाळून ‘नोंदणी नको एजंट आवरा,’ म्हणण्याची वेळ खऱ्या कामगारांवर आली आहे.बांधकाम कामगाराच्या ऑनलाईन नोंदणीसाठी ठेकेदाराच्या कार्यालयामध्ये दररोज झुंबड उडाली आहे. नोंदणी आणि नूतनीकरणासाठी ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचा दाखला सक्तीचा केला आहे. हा दाखला देण्यासाठी जिल्हा परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणी असलेला इंजिनिअर यांना शासनाने परवानगी दिली आहे. लाखो रुपयांच्या निविदांची कामे करणारे इंजिनिअर हजार-बाराशे रुपये घेऊन कामाची सवय नसलेल्या व्यक्तींना बोगस दाखले देत आहेत. एजंट, इंजिनिअर आणि कार्यालयाच्या मिलीभगतने काम करणारे कामगार या योजनेपासून बाजूला जात आहेत.

अशी होतेय लूटबांधकाम कामगाराच्या जिवावर डॉक्टर, लॅबचालक, जेवण पुरवठादार ठेकेदार गब्बर झाले आहेत. कामगाराच्या रक्त आणि लघवी तपासणीसाठी ३९०० ची लूट ठराविक डॉक्टर आणि तपासणी करणारे लॅबचालक करत आहेत. बांधकाम कामगारांना पुरविले जाणारे जेवण कुठेतरी डाळ नाही तर गरम पाण्यावरच स्वार, भात आहे तर रोटी नाही. लोणचे, गुळाचा पत्ता नाही. यासाठी ठेकेदार ६० रुपये आकारत असल्याने ठेकेदार गब्बर झाले आहेत.

कामगारांच्या न्याय हक्क मागणीसाठी लाल बावटा तसेच इतर कामगार संघटना काम करत आहेत. शासनाने ठेकेदार पोसण्यासाठी खासगी कंपन्यांना कंत्राट दिली आहेत. गवंडी, सेट्रिंग कामगार ८०० रुपयांची हजेरी बुडवून दिवसभर रांगेत उभा राहत नाही. त्यामुळे कंपनी चालक एजंट बोगस नोंद करत आहे. कामगार कार्यालयांना मॅनेज करून दर ठरवून बोगस नोंदी करून कामगारांची लूट सुरू आहे. - कॉम्रेड आनंदराव गुरव, कामगार नेते, इचलकरंजी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर