ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे कारखानदार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST2021-01-04T04:21:09+5:302021-01-04T04:21:09+5:30
कोपार्डे : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे हंगाम जोमात सुरू आहेत. पण कारखान्यांकडे ऊसतोड मजुरांची कमतरता असल्याने कारखानदार अडचणीत आहेत. ...

ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे कारखानदार अडचणीत
कोपार्डे : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे हंगाम जोमात सुरू आहेत. पण कारखान्यांकडे ऊसतोड मजुरांची कमतरता असल्याने कारखानदार अडचणीत आहेत. तसेच शेतकऱ्यांचीही आर्थिक लूट व मानसिक त्रास होत असल्याचे चित्र आहे. याच्या परिणामी कारखान्यांच्या चिटबॉय व शेतकऱ्यांच्यात तंटे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात २१ कारखान्यांचे हंगाम जोमात सुरू आहेत. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ७५ ते ८० हजार टन आहे. यासाठी कारखानदारांना स्वतःची तोडणी यंत्रणा राबवावी लागते. कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक ऊसतोड मजुरांची संख्या गेल्या पाच वर्षात वेगाने रोडावली आहे. तोडणी यंत्रावर काही कारखान्यांनी भर दिला आहे. पण ऊसतोडणी यंत्राला मर्यादा येत असल्याने ऊसतोड मजूर हाच एकमेव पर्याय राहतो.
जिल्ह्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, कर्नाटकच्या सीमाभागातील ऊसतोड मजूर येतात. पण यावर्षी कोरोनाची परिस्थिती व इतर राज्यात चांगली मजुरी मिळत असल्याने मजुरांनी पाठ फिरवली आहे. यामुळे दैनंदिन गाळपासाठी लागणारा ऊस पुरवठा होत नसल्याने कारखानदार पेचात सापडले आहेत. पुरेशी यंत्रणा नसलेल्या कारखानदारांनी यावर शेतकऱ्यांनाच खुद्दतोड करण्यासाठी उपाय योजला आहे. गेली अनेक वर्षे कारखाने आपल्या यंत्रणेकडून शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी आणत असल्याने आपला ऊस तोडून आणण्याची जबाबदारी कारखान्यांची असल्याचा मुद्दा समोर ठेवून चिटबॉय व शेती कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. काही ठिकाणी गट ऑफिसला टाळे ठोकण्याचे व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्याचे प्रकार होत आहेत.
। चौकट ।।
१)ऊसतोड मजूर जाऊ नयेत याची खबरदारी. मजुरांची कमतरता भासत असल्याने कारखानदार शेतकऱ्यांऐवजी मजुरांची बाजू घेत असल्याचे दिसत आहे. गाडी शेताच्या बांधाला लागत असली तरी, ५० ते २०० प्रति टन वरकड मागणी होते.
प्रतिक्रिया
पंढरीनाथ पाटील (शेतकरी)
-- ऊसतोड मजूर ऊस तोडा, बांधा, भरा आणि वरकड द्या अशी मागणी करत आहेत. खुद्दतोडीमुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे.
।। ऊस तोडणी मजुरांचा लेखाजोखा ।।
तोडणी -- प्रतिटन २६९ रुपये
वाहतूक -- प्रतिटन २५ रुपये