‘गोकुळ’तर्फे मंगल पाटील यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST2021-08-01T04:22:15+5:302021-08-01T04:22:15+5:30

कोल्हापूर : करवीर पंचायत समितीच्या नूतन सभापती मंगल आनंदराव पाटील यांचा सत्कार ‘गोकुळ’ दूध संघाच्या वतीने करण्यात आला. ...

Mangal Patil felicitated by 'Gokul' | ‘गोकुळ’तर्फे मंगल पाटील यांचा सत्कार

‘गोकुळ’तर्फे मंगल पाटील यांचा सत्कार

कोल्हापूर : करवीर पंचायत समितीच्या नूतन सभापती मंगल आनंदराव पाटील यांचा सत्कार ‘गोकुळ’ दूध संघाच्या वतीने करण्यात आला. संचालिका अंजना रेडेकर यांनी पाटील यांचा सत्कार केला. सभापती पाटील या ‘गोकुळ’चे संचालक प्रकाश पाटील यांच्‍या भावजय व संघाचे सेवानिवृत्त अधिकारी आनंदराव पाटील यांच्या पत्‍नी आहेत. मंगल पाटील म्‍हणाल्‍या, ‘गोकुळ’ व आमच्या कुटुंबीयांचे जुने ऋणानुबंध असल्याने हा सत्कार महत्त्वपूर्ण आहे. करवीर पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन सभापतीपदाची कारकीर्द यशस्वी करू. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सचिव एस. एम. पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : करवीर पंचायत समितीच्या नूतन सभापती मंगल पाटील यांचा सत्कार ‘गोकुळ’च्या वतीने संचालिका अंजना रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. (फोटो-३१०७२०२१-कोल-गोकुळ)

Web Title: Mangal Patil felicitated by 'Gokul'