शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

मंडलिक गटाचा कोल्हापूरात मेळावा; उमेदवारी न मिळाल्यास महायुतीत बंडखोरीची शक्यता

By समीर देशपांडे | Updated: March 15, 2024 14:56 IST

जर उमेदवारी नाहीच मिळाली तर बंडखोरीच्या पवित्र्यात मंडलिक दिसणार का असा प्रश्न जिल्हाभर उपस्थित केला जात आहे.

कोल्हापूर : शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा थोड्याच वेळात येथील दैवज्ञ बोर्डिंग मध्ये होणार आहे.  एकीकडे कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नसताना आणि संजय मंडलिक यांच्या ऐवजी भाजपचे समरजित घाटगे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा  दुपारी ४ वाजता होणार हा मेळावा लक्षवेधी ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नव्हती. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार यांच्याविषयी संभ्रमावस्था निर्माण झालेली असताना मंडलिक गटाने मात्र मेळावा आयोजित केल्याने चर्चेला ऊत आला आहे. जर उमेदवारी नाहीच मिळाली तर बंडखोरीच्या पवित्र्यात मंडलिक दिसणार का असा प्रश्न जिल्हाभर उपस्थित केला जात आहे. मंडलिक मात्र स्वतःच्या उमेदवारीवर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देतानाच माझ्या उमेदवारीचा निर्णय झालेला आहे असा विश्वास त्यांना असून या पार्श्वभूमीवर त्यांच्या या मेळाव्याकडे लक्ष लागून राहिले आहे

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४kolhapur-pcकोल्हापूर