शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Crime: एकत्र पिले..जेवलेही!, गाडीवरुन जाताना वाद उफाळला; केबलने गळा आवळून मित्राचा मृतदेह खांबाला बांधला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:04 IST

१०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले

कोल्हापूर : जेवायला गेल्यानंतर आईवरून शिवी दिल्याच्या रागातून दारूच्या नशेत मित्राने सिद्धू शंकर बनवी (वय २०, रा. वाशी नाका, कळंबा रिंगरोड, कोल्हापूर) याचा केबलने गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर मृतदेह फुटपाथवर टेलिफोनच्या खांबाला बांधून ठेवला होता.

हा प्रकार यल्लम्मा चौक ते हॉकी स्टेडियम चौकादरम्यान विश्वपंढरीजवळ सोमवारी (दि. १) पहाटेच्या सुमारास घडला. पोलिसांनी सहा तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपी मनीष जालिंदर राऊत (२८, रा. कळंबा रिंगरोड, कोल्हापूर) याला अटक केली. आईवरून शिवी दिल्याच्या रागातून त्याचा खून केल्याची कबुली मनीषने दिली.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू बनवी हा मूळचा कर्नाटकातील असून, गेल्या वर्षभरापासून कळंबा रिंगरोड येथे भावाकडे राहत होता. जवळच राहायला असलेला मनीष राऊत याच्याशी त्याची मैत्री झाली. रविवारी रात्री दोघे दारू पिऊन सिद्धूच्या दुचाकीवरून व्हिनस कॉर्नर येथे जेवायला गेले. जेवताना त्यांचा वाद झाला.सिद्धूने आईवरून शिवी दिल्याचा राग आरोपी मनीष याच्या मनात होता. जेवण करून मध्यरात्रीनंतर ते घराकडे निघाले. हॉकी स्टेडियम रोडवरील विश्वपंढरीसमोर आल्यावर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. दुचाकी थांबवून दोघांमध्ये झटापट सुरू झाली. त्यावेळी मनीष याने फुटपाथवरच्या टेलिफोन खांबावरून लोंबकळणाऱ्या केबलने सिद्धूचा गळा आवळला. त्यानंतर केबलने त्याला खांबाला बांधून तो दुचाकी घेऊन निघून गेला.पहाटे चारच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती मिळाली. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी सहकाऱ्यांसह जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. जुना राजवाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनेही गुन्ह्याचा समांतर तपास करून सीसीटीव्ही फुटेज आणि अंमलदार योगेश गोसावी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी मनीष राऊत याला वाशी नाका येथून ताब्यात घेतले.१०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासलेगुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी जुना राजवाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक ते स्टेशन रोड, दसरा चौक, सुभाष रोड, हॉकी स्टेडियम परिसरातील १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यात ते दोघे प्रथम व्हिनस कॉर्नर येथे दिसले. त्यानंतर दुचाकीवरून ते सुभाष रोडने हॉकी स्टेडियमकडे गेल्याचे दिसले. त्यावरून गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना मदत झाली.

दोघेही अविवाहितआरोपी राऊत हा शेतकरी असून, त्याच्या १५ म्हशी आहेत. आईवडिलांसोबत तो कळंबा रिंगरोड येथे राहतो. मयत सिद्धू हा मूळचा कर्नाटकातील असून, वर्षभरापूर्वी कळंबा रिंग रोड येथील भावाकडे राहायला आला होता. त्याचे आई, वडील गावाकडे राहतात. हे दोघे अविवाहित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.घटनेने खळबळवर्दळीच्या रस्त्याकडेला फुटपाथवर टेलिफोनच्या खांबाला बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळताच शहरात खळबळ उडाली. पहाटे फिरायला जाणाऱ्या काही व्यक्तींनी याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले. हा खून की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, अवघ्या सहा तासांत पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीस अटक केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Drunk friend kills over mother insult, ties body to pole.

Web Summary : In Kolhapur, a man murdered his friend after an argument about his mother. The accused strangled him with a cable and tied the body to a telephone pole near a stadium. Police arrested the killer within six hours. The motive was revenge for verbal abuse.