शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा बाळगणाऱ्या एकास कोल्हापुरात अटक, ७४ हजाराच्या नोटा जप्त; चंदगड तालुक्यातील तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 20:19 IST

अटक केलेल्या तरुणाच्या ताब्यातून ५०० रुपयेच्या १४८ अशा सुमारे ७४ हजार रुपयेच्या बनावट नोटा जप्त केल्या.

कोल्हापूर : बनावट नोटा जवळ बाळगणाऱ्या एका तरुणास कोल्हापुरात अटक करण्यात आली आहे. संबंधित तरुण चंदगड तालुक्यातील असून त्यास शहरातील शिवाजी पार्क परिसरात चिंतामणी अपार्टमेंटनजीक ताब्यात घेण्यात आले. प्रमोद उर्फ दयानंद पुंडलीक मुळीक (वय ३१ रा. मजरे शिरगाव, पो. नागनवाडी, ता.  चंदगड, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्याच नाव आहे. त्याच्या ताब्यातून ५०० रुपयेच्या १४८ अशा सुमारे ७४ हजार रुपयेच्या  बनावट नोटा जप्त केल्या. ही कारवाई  स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने आज, बुधवारी दुपारी केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अंमलदार ओंकार परब यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रमोद मुळीक हा  बनावट नोटा घेऊन तो शिवाजी पार्कमध्ये येणार होता. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून शिवाजी पार्कमधील चिंतामणी अपार्टमेंट परिसरात मुळीक याला अटक केली. त्याच्या ताब्यातील एकूण ७४ हजार रुपये किंमतच्या १४८ बनावट नोटा जप्त केल्या. ह्या जप्त केलेल्या नोटांसह आरोपी ओंकार परब याला शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, पोलीस अंमलदार सुनिल  कवळेकर, ओंकार परब, अमोल कोळेकर, अजय वाडेकर, वसंत पिंगळे, संदीप कुंभार, नितीन चोथे, तुकाराम राजीगरे, सागर कांडगावे, अनिल जाधव यांच्या पथकाने केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस