शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
6
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
7
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
8
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
9
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
10
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
11
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
12
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
13
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
14
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
15
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
16
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
17
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
18
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
19
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
20
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबाबाई मंदिर सुरक्षेची पोलखोल अंगलट, एकास अटक; कमरेला पिस्तूल लावून केला होता मंदिरात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:58 IST

राहुल चतुर्वेदी याचा शोध सुरू, बंदोबस्तावरील पोलिसांना प्रकरण भोवणार

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील सुरक्षेची पडताळणी करण्यासाठी सोमवारी (दि. २९) कमरेला पिस्तूल लावून आत जाणारा भाविक राहुल चतुर्वेदी याच्यासह सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता संभाजी उर्फ बंडा माधवराव साळुंखे (रा. धोत्रे गल्ली, गंगावेश, कोल्हापूर) या दोघांवर जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शस्त्र कायदा आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी साळोखे याला अटक केली. मंदिर सुरक्षेचे पडताळणी करण्याचा प्रकार दोघांना अंगलट आला. चतुर्वेदी याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.अंबाबाई मंदिरातील ढिसाळ सुरक्षा व्यवस्था आणि बंद पडलेल्या यंत्रसामग्रीची वस्तुस्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता बंडा साळुंखे आणि मुंबईतील भाविक राहुल चतुर्वेदी हे कमरेला पिस्तूल लावून मंदिरात गेले होते. त्यांनीच याचा व्हिडिओ तयार करून सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, सुरक्षा भेदून थेट पिस्तुलासह मंदिरात जाण्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. जिल्हा प्रशासन, देवस्थान व्यवस्थापन समिती आणि पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेऊन साळुंखे आणि चतुर्वेदी यांच्यावर गुन्हा दाखल केला. साळुंखे याला सोमवारी रात्री अटक केली, तर चतुर्वेदी याचा शोध सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर केलेला मनाई आदेश आणि शस्त्र परवाना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरू आहे. साळुंखे याला न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली. याप्रकरणी सहायक फौजदार संगीता रघुनाथ विटे यांनी फिर्याद दिली.चतुर्वेदी राजकीय बांधकाम व्यावसायिकपिस्तूल घेऊन मंदिरात जाणारा चतुर्वेदी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आहे. तो मूळचा वाराणसी येथील असून, एका राजकीय पक्षाचा पदधिकारी असल्याचे साळुंखे याने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडील पिस्तूल खरे होते की खोटे, याचा उलगडा त्याला ताब्यात घेतल्यानंतरच होणार आहे.

ठरवून केली सुरक्षेची पोलखोलनवरात्रोत्सवात मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. त्यानंतर मात्र हळूहळू सुरक्षा व्यवस्थेत शिथिलता येते. मेटल डिटेक्टर, स्कॅनरची वेळेवर दुरुस्ती होत नाही. बंदोबस्तावरील कर्मचारी मोबाइलमध्ये दंग असतात. मेटल डिटेक्टरच्या बाजूने लोकांची ये-जा सुरू असते. सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा दाखवण्यासाठी साळुंखे आणि चतुर्वेदी यांनी ठरवून पिस्तूलसह मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली.बंदोबस्तावरील पोलिसांना प्रकरण भोवणारमंदिराच्या चार दरवाजांवर प्रत्येकी तीन पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतात. याशिवाय देवस्थान समितीचे सुरक्षारक्षकही मदतीला उपस्थित असतात. रोज सकाळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून मंदिराची तपासणी केली जाते. या सर्वच कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. लवकरच चौकशीचा अहवाल पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे सादर करणार असल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले. कर्तव्यात कसुरी केल्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Ambabai Temple Security Breach: One Arrested for Pistol Entry

Web Summary : Kolhapur's Ambabai temple security was breached when a man entered with a pistol to expose flaws. One person is arrested; investigation underway regarding security lapses and potential negligence of on-duty officers.