मांजराच्या पिल्लाला वाचविण्यासाठी लहान मुलांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 14:34 IST2019-06-03T14:32:29+5:302019-06-03T14:34:37+5:30

‘माणुसकी जपणारे लोक’ अशी कोल्हापूरकरांची ओळख आहे. या माणुसकीप्रमाणेच रविवारी सकाळी बाबूजमाल परिसरातील चिमुरड्यांची प्राणिमात्रांबाबतची ममता दिसून आली. या चिमुरड्यांनी धडपड करून मांजराच्या लहान पिल्लाला वाचविले.

Mamta's mother in Babujamal Darga area | मांजराच्या पिल्लाला वाचविण्यासाठी लहान मुलांची धडपड

कोल्हापुरातील बाबूजमाल दर्गा परिसरातील चिमुकल्यांनी धडपड करून मांजराच्या लहान पिल्लाला वाचविले. त्यांच्यासमवेत ‘व्हाईट आर्मी’चे प्रशांत शेंडे यांनी ‘सेल्फी’ टिपली.

ठळक मुद्देबाबूजमाल दर्गा परिसरातील चिमुरड्यांची ममतामांजराच्या पिल्लाला वाचविण्यासाठी लहान मुलांची धडपड

कोल्हापूर : ‘माणुसकी जपणारे लोक’ अशी कोल्हापूरकरांची ओळख आहे. या माणुसकीप्रमाणेच रविवारी सकाळी बाबूजमाल परिसरातील चिमुरड्यांची प्राणिमात्रांबाबतची ममता दिसून आली. या चिमुरड्यांनी धडपड करून मांजराच्या लहान पिल्लाला वाचविले.

‘नुरानी भाई यांनी दूरध्वनीवरून माहिती दिल्यानंतर बाबूजमाल दर्ग्याच्या मागील बाजूस पोहोचलो. उन्हाचा तडाखा बसल्याने मांजराचे पिल्लू पत्र्यावरून खाली कोसळले होते. ते काही खात-पीत नसल्याची माहिती त्यांनी दिली होती.

तिथे गेल्यानंतर परिसरातील काही लहान मुले माझ्याभोवती जमली. त्यांतील एकाने आणलेले दूध त्या पिल्लाला पाजले. अन्य मुले त्याला मदत करीत होती. मला त्यांचे कौतुक वाटले. त्या मुलाच्या घरी दूध नसल्यामुळे त्याने दुसऱ्याच्या घरातून मागून दूध आणले होते.

या मुक्या पिल्लाला वाचविण्यासाठी लहान मुलांनी केलेली धडपड पाहून मला आनंद वाटला. त्यांच्यासोबत मांजराला पिल्लाला घेऊन सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही,’ असे ‘व्हाईट आर्मी’चे प्रशांत शेंडे यांनी सांगितले.

 

Web Title: Mamta's mother in Babujamal Darga area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.