शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

बांधकाम कामगारांच्या भोजनावर ठेकेदारांचाच ढेकर, जेवणही निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 12:50 IST

माहिती देण्यास टाळाटाळ

कोल्हापूर : बांधकाम कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या भोजन योजनेत ते जेवण पुरवठा करणारे ठेकेदारांनीच ढेकर दिल्याचे चित्र कोल्हापुरात आहे. प्रत्यक्षात नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांपेक्षा अधिक जेवणाच्या थाळ्यांचे वितरण झाल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे भोजन वाटपाचा ठेका घेतलेलेच कामगारांच्या जेवणावर ताव मारत आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानसभेत भोजन गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जून २०२१ मध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दोन वेळा मोफत जेवण देण्याच्या योजनेला सुरुवात झाली. जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या एक लाख ३१ हजार कामगारांपैकी ३० ते ४० हजार कामगारांना सुरुवातीच्या टप्प्यात जेवण वाटप करण्यात येत होते. माणगाव येथील सेंट्रल किचनमध्ये वाटपासाठी जेवण तयार केले जाते.मात्र, पहिल्यापासूनच जेवणाच्या दर्जासंबंधी प्रचंड तक्रारी आहेत. निकृष्ट दर्जाचे जेवण स्वीकारण्यास मध्यतंरी अनेक कामगारांनी नकार दिल्याने शिल्लक अन्न माणगाव परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास आले होते. तरीही ठेकेदार कंपनी एका थाळीला ६२ रुपये ७० पैसे मिळत असल्याने जेवण वाटप सुरूच ठेवले. कामगारांच्या संख्येपेक्षा अधिक थाळ्या दाखवून त्यांनी बिल उचलल्याचेही आरोप आहेत. यामुळे भोजन योजना कामगारांसाठी की ठेकेदारांसाठी, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

जेवणाचा निकृष्ट दर्जा, वेळेत मिळत नसल्याने मोफत असूनही भोजन घेण्याकडे अनेक कामगारांनी पाठ फिरवली. सध्या रोज केवळ १७०० बांधकाम कामगारांना जेवणाचे वाटप होते. जेवण वाटपाचे केंद्र पन्हाळा, राधानगरी, कागल तालुक्यात आहे.

माहिती देण्यास टाळाटाळयोजना सुरू झाल्यापासून किती थाळ्यांचे वितरण झाले, त्यासाठी किती बिल शासनाकडून ठेकेदार कंपनीस मिळाले यासंबंधीची माहिती देण्यास सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील यंत्रणा टाळाटाळ करीत आहे. कार्यालयात भेट देऊन मागणी केल्यावरही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

बांधकाम कामगारांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. प्रत्यक्ष कामगारांपेक्षा थाळी वाटप अधिक दाखवून बिल काढले जात आहे. म्हणून जेवण वाटप बंद करून त्याऐवजी दरमहा बांधकाम कामगारांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करावेत. -शिवजी मगदूम, जिल्हा सचिव, लाल बावटा बांधकाम कामगार संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूर