पर्यावरणपूरक उपक्रमांनी मालोजीराजे यांचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:09+5:302021-07-04T04:17:09+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या आवाहनानुसार गर्दी टाळून विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांनी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा ...

पर्यावरणपूरक उपक्रमांनी मालोजीराजे यांचा वाढदिवस
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या आवाहनानुसार गर्दी टाळून विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांनी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा शनिवारी वाढदिवस साजरा करण्यात आला.
यानिमित्त शिवाजी तंत्रनिकेतनच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या हस्ते एक हजार रोपे वृक्षारोपणासाठी वाटप करण्यात आली. शेंंडापार्कातील कुष्ठधाममध्ये जनसंघर्ष सेनेतर्फे शुभम शिरहट्टी यांच्या वतीने पीडितांना फळे, सॅनिटायझर, मास्क, पाणी बाॅटल आदींचे वाटप करण्यात आले. आर. के. नगरातील मातोश्री वृद्धाश्रमात कोल्हापुरातील टेबल टेनिसपटूंतर्फे धान्य व नेपोलियन सोनुले यांच्या वतीने दहा हजारांची देणगी आणि साने गुरुजी वसाहतीतील महापालिका कोविड सेंटरला पीपीई किट, ग्लुकोमीटर, ऑक्सिमीटर, मास्क, हॅण्डग्लोव्हज आदी साहित्य भेट देण्यात आले. यावेळी प्राचार्या राजगुरू, व्यवसाय शिक्षण अधिकारी विलास सोनवणे, माजी नगरसेवक राजाराम गायकवाड, अर्जुन माने, अश्किन आजरेकर, रत्नेश शिरोळकर, शुभम शिरहट्टी, भाऊ घोडके, संदीप चौगुले, आदी उपस्थित होते. संयोजन प्रतापसिंह घोरपडे, जयदीप जाधव, गणेश शिंदे आदींनी केले.
फोटो : ०३०७२०२१-कोल-मालोजीराजे
आेळी : कोल्हापुरातील शिवाजी तंत्रनिकेतनमध्ये माजी आमदार मालोजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते वृक्षारोपणासाठी रोपे वाटण्यात आली.