शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ५६ कोटींचा गंडा, मेकरच्या सूत्रधार दाम्पत्यास अटक; दोन कोटींची मालमत्ता जप्त

By उद्धव गोडसे | Updated: January 1, 2024 19:18 IST

कंपनीसह २३ जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मेकर ग्रुप ऑफ इंडिया या कंपनीचे प्रमुख रमेश महादेव वळसे-पाटील (वय ६०) आणि छाया रमेश वळसे-पाटील (वय ५४, दोघेही रा. आकुर्डी, जि. पुणे) या दाम्पत्याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी (दि. ३१) पुण्यातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता, रमेश याला सहा दिवसांची, तर छाया यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. अटकेतील संशयितांची सुमारे दोन कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.मेकर ग्रुप ऑफ इंडिया या कंपनीने २०१० ते २०१८ या कालावधीत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाखांची फसवणूक केली. वारंवार पाठपुरावा करूनही भरलेले पैसे आणि त्यावरील परतावा परत मिळत नसल्याने डिसेंबर २०१८ मध्ये गुंतवणूकदारांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंपनीसह २३ जणांवर गुन्हा दाखल झाला.आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपासाची सूत्रे येताच निरीक्षक कळमकर यांनी तपासात गती घेतली आहे. गेल्या आठवड्यातील या गुन्ह्यातील तिघांना अटक केली होती. त्यानंतर आता कंपनीचा प्रमुख आणि गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रमेश वळसे-पाटील आणि त्याची पत्नी छाया या दोघांना पुण्यातून अटक केली. दोन्ही संशयितांकडील सुमारे दोन कोटी रुपयांच्या मालमत्तांची कागदपत्रे पोलिसांना मिळाली आहेत. त्यांची बँक खाती गोठवण्यासाठी संबंधित बँकांशी पत्रव्यवहार केल्याची माहिती निरीक्षक कळमकर यांनी दिली. आजपर्यंत या गुन्ह्यातील १० संशयितांना अटक झाली असून, अन्य १३ जणांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस