शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मेकरच्या संचालकांची अडीच कोटींची संपत्ती जप्त, मुख्य सूत्रधारासह १३ संशयितांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 11:42 IST

मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक 

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेकर ॲग्रो इंडिया प्रायव्हेट ग्रुपच्या २३ जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील १३ जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांची सुमारे अडीच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.मेकर ॲग्रो कंपनीने गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित केले. २०१० ते २०१८ या कालावधीत गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाखांची फसवणूक केली. याबाबत डिसेंबर २०१८ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २३ संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, प्राथमिक तपास झाल्यानंतर पुढे या गुन्ह्याचा तपास रखडला होता.अखेर गुंतवणूकदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायाधीशांच्या आदेशाने तपासाला गती आली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची सूत्रे स्वीकारल्यानंतर १० संशयितांना अटक केली. यात गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रमेश महादेव वळसे-पाटील आणि त्याच्या पत्नीचाही समावेश आहे. अटकेतील संशयितांची दोन कोटी ३५ लाख १४ हजार ९३७ रुपयांची स्थावर मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. तसेच दोन लाख १० हजारांची जंगम मालमत्ता जप्त केली. बँकेतील एक लाखाची मुदत ठेवही गोठविण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.आणखी मालमत्तांचा शोधया गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार रमेश वळसे-पाटील याच्या आकुर्डी (पुणे) आणि कारकुडी (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील फ्लॅटची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दोन्ही मालमत्तांचे शासकीय मूल्यांकन करून जप्तीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. अन्य संशयितांच्या मालमत्तांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी