युवा सप्ताह विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यशस्वी करा - भाऊसाहेब गलांडे : नेहरू युवा केंद्राचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:19+5:302021-01-13T05:04:19+5:30
कोल्हापूर : नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून १२ ते १९ तारखेदरम्यान युवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. हा सप्ताह ...

युवा सप्ताह विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यशस्वी करा - भाऊसाहेब गलांडे : नेहरू युवा केंद्राचे आयोजन
कोल्हापूर : नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून १२ ते १९ तारखेदरम्यान युवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. हा सप्ताह सर्वच विभागाने एनसीसी, एनएसएस तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यशस्वी करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी मंगळवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अग्रणी जिल्हा प्रबंधक राहुल माने, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त संजय माळी, ‘एनएसएस’चे अभय जायभाये, एनसीसीचे सुधाकर नवगिरे, क्रीडाधिकारी बालाजी बडबडे, स्काऊड गाईडचे संजय नेबापुरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर उपस्थित होत्या.
ते म्हणाले, सर्व विभागांनी समन्वय ठेवून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून युवा सप्ताहाबरोबरच नेहरू युवा केंद्राच्या कार्यक्रमात सहभागी होवून वार्षिक कृती आराखडा यशस्वी करावा. श्रमदान, रक्तदान शिबिर, लोकगीत, लोकनृत्य, राष्ट्रीय गीते, स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान व शिकवण या विषयावर वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित कराव्यात. युवकांनी स्वत:हून निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करावे.
जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. पर्यवेक्षक बी. पी. यादव यांनी एड्स जनजागृतीअंतर्गत झालेल्या पथनाट्य, वॉल पेंटिंग, कोरोनाकाळात केलेले धान्य, मास्क वाटप याबाबत माहिती दिली.
.............................
फोटो नं १२०१२०२१-कोल-युवा दिन कलेक्टर ऑफीस
ओळ : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी युवा सप्ताहाअंतर्गत आयोजित बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी मार्गदर्शन केले.
...................