शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

शंभर टक्के लसीकरणासाठी गावनिहाय आराखडा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ज्येष्ठ तसेच व्याधीग्रस्त नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक, आशा, कोतवाल ...

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ज्येष्ठ तसेच व्याधीग्रस्त नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक, आशा, कोतवाल यांना नोंदणीचे प्रशिक्षण द्या, लोकांचे प्रबोधन, जास्तीत-जास्त नोंदणी करणे याबाबत गावनिहाय आराखडा तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन त्यांनी वरील सूचना केल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे, डॉ. फारुख देसाई उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, मृत्युदर रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून, तालुक्यातील मोठ्या खासगी रुग्णालयांचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रस्ताव पाठवावेत. प्रत्येक गावातील ज्येष्ठ आणि व्याधीग्रस्त नागरिकांची यादी घ्या. गावनिहाय नोंदणी आणि लसीकरणाचे नियोजन करा. त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना गावे वाटून द्या, गावांमध्ये जनजागृती करा, नोंदणी करण्यासाठी शिक्षक, आशा सेविका यांची मदत घ्या. पहिल्या टप्प्यात गावातील स्थानिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक यांचे प्रथम लसीकरण करून घ्या, त्यांचा अनुभव इतरांसाठी प्रोत्साहन ठरेल.

मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले, शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी दवंडी, व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तसेच तरुण मंडळांच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती करा. ज्या अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण राहिले असेल, त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रथम आपले लसीकरण करून घ्यावे. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही महापालिकेतर्फे करण्यात आलेले नियोजन सांगितले. यावेळी कोविन ॲपवर नोंदणी कशी करायची याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले.

बैठकीस प्रांताधिकारी वैभव नावडकर, अमित माळी, डॉ. संपत खिलारी, विजया पांगारकर, डॉ. विकास खरात, रामहरी भोसले, महिला व बाल विकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, डॉ. उषादेवी कुंभार उपस्थित होत्या.

खासगीमध्ये २५० व शासकीयमध्ये ‘मोफत’चा फलक लावा

ही लस शासकीय रुग्णालयात मोफत व खासगीमध्ये २५० रुपयांना देण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात मोफत लस आणि खासगीमध्ये दराचा फलक दर्शनी भागात लावावा. याठिकाणी जास्तीचे पैसे घेतले जाणार नाहीत तसेच गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

ज्येष्ठ नागरिकांची सोय करा

ज्येष्ठांची शिक्षक, आशा सेविका यांच्या माध्यमातून नोंदणीकरणाचे नियोजन करा. नोंदणीनंतरच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी पाठवावे. त्यामुळे गर्दी होणार नाही किंवा ज्येष्ठांना रांगेत उभे राहावे लागणार नाही व त्यांचे लसीकरण अल्पावधीत होईल. व्याधीग्रस्त व्यक्तींसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याविषयी जनजागृती करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

---

फोटो नं ०३०३२०२१-कोल-लसीकरण बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ व व्याधीग्रस्तांच्या लसीकरणाच्या नियोजनाची बैठक झाली. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशीककर, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, डॉ. योगेश साळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

-