शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सख्य करा, पण जागांवर गंडांतर नको

By admin | Updated: April 17, 2015 00:13 IST

तासगाव-कवठेमहांकाळकरांची मागणी : जिल्हा बँक निवडणुकीसाठी जयंतरावांची चाचपणी

सांगली : निवडणुकीत कोणाशीही सख्य केले तरी आमची हरकत नाही, पण राष्ट्रवादीच्या दोन्ही तालुक्यातील जागांवर कोणतेही गंडांतर नको, अशी मागणी गुरुवारी तासगाव व कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्याकडे केली. जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात जयंतरावांनी तालुकानिहाय कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सांगलीत त्रिकोणी बागेसमोरील कार्यकर्त्याच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, इच्छुक यावेळी उपस्थित होते. तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांशी जयंतरावांनी उशिरापर्यंत चर्चा केली. या बैठकीसाठी तासगावातून दिनकर पाटील, किशोर उनउने, हणमंत देसाई, कवठेमहांकाळमधून विजय सगरे यांच्यासह सुमारे ३0 कार्यकर्ते उपस्थित होते. दिनकर पाटील म्हणाले की, आर. आर. पाटील असताना तासगाव तालुक्याला तीन आणि कवठेमहांकाळ तालुक्याला दोन जागा होत्या. आबा आता आमच्यात नाहीत. त्यामुळे जयंतरावांनी याबाबत निर्णय घेताना दोन्ही तालुक्यांमधील पक्षाच्या जागांवर गंडांतर येणार नाही, याची काळजी घ्यावी. एकत्रित पॅनेल करायचे किंवा कोणाला सोबत घ्यायचे, याबाबतचा निर्णय सर्वस्वी जयंतरावांचाच असेल. त्याबाबत आमची कोणतीही अट नाही. एकत्रित येताना आमच्या जागा कमी होऊ नयेत, अशी आम्ही मागणी केली आहे. दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठक घेऊन उमेदवारांची नावे कळवतील. त्यानुसार निर्णय घ्यावा, असे सुचविले आहे. मिरज तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी, नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी अशी मागणी केली.मिरजेसाठी नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, अतहर नायकवडी, किरण सूर्यवंशी उपस्थित होते. खानापूरसाठी बाबासाहेब मुळीक व आटपाडीतून राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याशी जयंतरावांनी चर्चा केली. बैठकीस विलासराव शिंदे, संजय बजाज, दिलीपतात्या पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)जयंतरावांकडे सर्वाधिकारबहुतांश तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पॅनेल आणि उमेदवार निवडीचे अधिकार जयंतरावांना दिले. केवळ तासगाव आणि कवठेमहांकाळमधील पदाधिकाऱ्यांनी उमेदवार निवडीचे अधिकार तालुक्याकडे घेतले.