शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

पात्र प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणी अनिवार्य करा

By admin | Updated: January 23, 2015 23:34 IST

‘अभाविप’ : प्र-कुलगुरूंना दिले विविध मागण्यांचे निवेदन

कोल्हापूर : विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक ६० दिवस आधी प्रसिद्ध करावे. सर्व निकाल ४५ दिवसांत लावण्यात यावेत. सर्व पात्र प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अनिवार्य करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आज, शुक्रवारी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांना दिले.सत्र परीक्षांचे शुल्क ५० टक्क्यांनी कमी करावे. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न, प्रवेशपत्र, गुणपत्रिका, आदींमधील गोंधळ त्वरित नियंत्रणात आणावा. विद्यापीठ व महाविद्यालयांतील शुल्क जमा करण्यासाठी ‘ई-पेमेंट’ सुरू करावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे ‘अभाविप’च्या शिष्टमंडळाने केल्या. अभ्याससंच उपलब्ध झाले नसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत देण्यात येईल. अन्य मागण्यांबाबत प्रशासनाकडून विचार करून कार्यवाही केली जाईल, असे प्र-कुलगुरू डॉ. भोईटे यांनी सांगितले. शिष्टमंडळात अधिसभा सदस्य अमित कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री देवदत्त जोशी, कोल्हापूर जिल्हा संयोजक स्वागत परुळेकर, इचलकरंजी महामंत्री पंकज गडकरी, सांगलीच्या सुप्रिया पाडळकर, आदींचा समावेश होता. . (प्रतिनिधी)