शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

राज्याप्रमाणेच कोल्हापूर महापालिकाही भाजपमुक्त करा : मोहम्मद प्रतापगढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 15:26 IST

महाराष्ट्र राज्याची सत्ता ज्याप्रमाणे भाजपमुक्त केली, त्याचप्रमाणे कोल्हापूर महापालिकाही आगामी निवडणूकीत भाजपमु्क्त करा, असे आवाहन प्रख्यात कवी, काँग्रेसचे युवा नेते मोहम्मद इम्रान प्रतापगढी यांनी केले. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मंगळवार पेठेतील खासबाग चौक येथील जनसंपर्क कार्यालय उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देराज्याप्रमाणेच कोल्हापूर महापालिकाही भाजपमुक्त करा : मोहम्मद प्रतापगढी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याची सत्ता ज्याप्रमाणे भाजपमुक्त केली, त्याचप्रमाणे कोल्हापूर महापालिकाही आगामी निवडणूकीत भाजपमु्क्त करा, असे आवाहन प्रख्यात कवी, काँग्रेसचे युवा नेते मोहम्मद इम्रान प्रतापगढी यांनी केले. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मंगळवार पेठेतील खासबाग चौक येथील जनसंपर्क कार्यालय उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रा. जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी महापौर निलोफर आजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रतापगढी यांनी काव्यशैलीत मोदी सरकारवर निशाणा साधला.

ते म्हणाले, भाजप नेहमी देशाला काँग्रेसमुक्त करण्याची गोष्ट करते. परंतु महाराष्ट्राच्या सत्तेतून भाजपमु्क्त करून देशात महाविकास आघाडीने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. येथील सरकारचे काम देशातील इतर राज्यांच्या तुलनेत चांगले आहे.

राज्यातील लोकांच्या मनात सरकारने घर केले आहे. वास्तविक कोल्हापूर महापालिकेमधूनच याची सुरुवात झाली होती. देशातून काँग्रेस मु्क्त करणार म्हणणाऱ्यांना ही चपराक आहे. आगामी निवडणुकीत पूर्ण भाजपमुक्त महापालिका करावी. महाराष्ट्रातील सत्ता गेलेली भाजप पचवू शकलेली नाही. त्यामुळेच नेहमी सरकार पडण्याची भाष करते.

कोल्हापूरच्या मातीला आपला सलाम आहे. येथील कोल्हापुरी चपला, मिरची जगप्रसिद्ध आहेत. याच मिरचीने भाजपला ठसका देण्याचे काम केले. कोल्हापूरची संस्कृती ही ओळख आहे. कोरोनामध्येही हे तुम्ही दाखवून दिले आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न झाले. ईडी, आयकर मागे लावले. मात्र, शरद पवार यांच्यामुळे ते शक्य झाले नाही. महाविकास आघाडीची सरकार स्थापण्याचा पवारांचा पॉवर गेम मोदींसह भाजपला वरचढ ठरल्याचेही प्रतापगढी यांनी सांगितले.यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले. आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अभय छाजेड, काँग्रेस शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेस शहराध्यक्षा संध्या घोटणे, माजी उपमहापौर संजय मोहिते, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :MLAआमदारkolhapurकोल्हापूर