शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर गावांच्या फाट्यावर उड्डाणपूल, भुयारी मार्ग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा-कागलपर्यंतचा भाग सहा पदरीकरण होणार आहे. यामध्ये येणाऱ्या गावांची दळणवळणाची चांगली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा-कागलपर्यंतचा भाग सहा पदरीकरण होणार आहे. यामध्ये येणाऱ्या गावांची दळणवळणाची चांगली सोय व्हावी, रस्ता ओलांडताना स्थानिकांची गैरसोय होवू नये, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

दौरा दरम्यान, कागल ते किणीपर्यंत ग्रामस्थांनी रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची मागणी केली. ठिकठिकाणी थांबून ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून मागणीचे निवेदन स्वीकारले. महामार्ग सहापदरीकरणाचे प्रत्यक्षात काम करताना कोणताही अडथळा येवू नये, महामार्गालगतच्या गावांच्या दळण वळणात अडचणी येवू नये, यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याचे आयोजन केले.

रविवारी दुपारी तीन वाजता कागलपासून दौऱ्याला सुरुवात केले. येथे मंत्री मुश्रीफ सहभागी झाले. नगराध्यक्ष माणिक माळी, सहापदरी कृती समितीचे अध्यक्ष भय्या माने, उपाध्यक्ष संजय ठाणेकर, बी. जे. नाईक यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. त्यांनी निवेदनाद्वारे लक्ष्मी टेकडी येथे उड्डाणपूल उभारावे किंवा टू-वे भुयारी मार्ग करावा, कागल पंचायत समितीजवळील भुयारी मार्गाची रुंदी आणि उंची वाढवावी, मुरगूड नाका येथे उड्डाणपूल करावे, महामार्गावरून कागल शहरात प्रवेश करणाऱ्या जोडपुलाची रूंदी वाढवावी आदी दहा मागण्या करण्यात आल्या.

तेथून पथक लक्ष्मी टेकडी येथे आले. तिथे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील प्रमुख उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. चर्चेवेळी भुयारी आणि उड्डाणपुलांसंबंधी चर्चा केली. चर्चेच्या शेवटी पालकमंत्री पाटील, खासदार मंडलिक यांनी उद्योजकांच्या मागणीचा विचार प्राधान्याने करावा, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर कणेरी, विकासवाडी, गोकुळ शिरगाव फाट्यावर थांबून पाहणी करण्यात आली. या गावातील ग्रामस्थांनीही रस्ता ओलांडताना प्रचंड गैरसोय होत असल्याचे सांगितले. उजळाईवाडी फाट्यावर ग्रामस्थांनी कोल्हापूर शहरातून गावात जाण्यासाठी असलेला भुयारी मार्ग रूंद करावा किंवा स्वतंत्र उड्डाणपूल उभारावे, अशी मागणी केली. येथे सध्या उड्डाणपूल असल्याने नवीन पूल बांधणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सरनोबतवाडी, उचगाव, तावडे हॉटेल, शिरोलीफाटा, नागाव, टोप, अबंप, वाठार, किणी फाट्याचीही पाहणी करून या गावातील ग्रामस्थांचीही मागणी जाणून घेतली.

दौऱ्यात राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, सर्वेअर आर. डी. काटकर, तहसीलदार शीतल मुळे आदी अधिकारी उपस्थित होते.

चौकट

फटाक्यांची आतषबाजी आणि स्वागत

पाहणीवेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री पाटील, खासदार मंडलिक यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांचे स्वागत करत होते. सरनोबतवाडी फाट्यावर तर चक्क फटाक्याची आतषबाजी करून स्वागत केले.

कोट

राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागलपर्यंत सहापदरीकरण होणार आहे. या दरम्यान अनेक गावे आहेत. या ग्रामस्थांची महामार्गाच्या दोन्ही बाजूला शेती आहे. औद्योगिक वसाहती आहेत. या सर्वांची सोय होण्यासाठी स्थानिकांशी चर्चा केली. कागल ते किणी नाक्यापर्यंत येणाऱ्या सर्व गावांच्या फाट्यावर थांबून ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.

सतेज पाटील, पालकमंत्री