शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: करड्याळ ग्रामपंचायतीत बहुमत मुश्रीफ गटाचे; मात्र, सरपंच-उपसरपंचपद घाटगे-मंडलिक गटाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 18:30 IST

मुश्रीफ गटाचे बहुमत असूनही सरपंच-उपसरपंच विरोधी गटाचा

शशिकांत भोसलेसेनापती कापशी : करड्याळ (ता. कागल) येथे लोकनियुक्त सरपंच प्रियांका प्रकाश पाटील यांनी २ मतांचा वापर केल्याने उपसरपंचपदी समरजित घाटगे गटाचे कृष्णात आण्णासो कुंभार यांची निवड झाली. मुश्रीफ गटाचे बहुमत असूनही उपसरपंच विरोधी गटाचा झाला. निवडणुकीत मुश्रीफ गटाच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे चार व समरजित घाटगे - संजय मंडलिक - संजय घाटगे गटाच्या भावेश्वरी परिवर्तन आघाडीचे तीन सदस्य निवडून आले. लोकनियुक्त सरपंचपदी भावेश्वरी आघाडीच्या प्रियांका पाटील निवडून आल्या.आज उपसरपंचपदाच्या निवडीसाठी मुश्रीफ गटाकडून दत्तात्रय बाळासो कामते व भावेश्र्वरी आघाडीकडून कृष्णात आण्णासो कुंभार यांनी अर्ज दाखल केले. दोघांनाही समसमान चार मते पडली. यावेळी सरपंच पाटील यांनी दोन मतांचा वापर केल्याने उपसरपंचपदी समरजित घाटगे गटाचेच कृष्णात कुंभार यांचा एका मताने विजय झाला. ग्रामपंचायतीवर मुश्रीफ गटाचे बहुमत असूनही उपसरपंच देखील विरोधी गटाचाच झाला. यावेळी प्रकाश पाटील, शिवाजी गेंगे, बळीराम कुंभार, शिवाजी कुंभार, सुरेश गेंगे आदीसह सर्व प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकालानंतर कुंभार समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे