शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: हातकणंगलेत इंडस्ट्रीजला भीषण आग, चार कामगार गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:25 IST

कंपनीचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

हातकणंगले : येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतमधील कालिया ग्रुपच्या आयुष इंडस्ट्रीजमध्ये गुरुवारी दुपारी १ वाजता वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरला शॉटसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे चार कर्मचारी गंभीर जखमी झाले. यात कंपनीचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जखमी कामगारांवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची तक्रार कंपनीचे चालक आयुष दिनेशकुमार कालिया यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.हातकणंगलेच्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतमधील कालिया ग्रुपच्या आयुष इंडस्ट्रीजला भरदुपारी रणरणत्या उन्हात कंपनीच्या आवारातील ट्रान्सफॉर्मरला आग लागली. ती कंपनीच्या इलेक्ट्रिक विभागापर्यंत पोहोचली. कंपनीतील ऑइल आणि कच्च्या मालाला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. आग विझवताना कंपनीचे दीपक कांबळे ( वय ४० रा.रुई) राहुल पाटील (३४ रा. कोल्हापूर), रामनिवास बन्ना, (३५), अविनाश शेरेकर (३२ दोघे रा.माणगाव) या कामगारांना आगीच्या झळा लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम आयजीएम रुग्णालय इचलकरंजी येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Major Fire at Hatkanangale Industry; Four Workers Severely Injured

Web Summary : A fire broke out at Ayush Industries in Hatkanangale due to a transformer short circuit, injuring four workers. The estimated loss is ₹50 lakhs. The injured are receiving treatment in Kolhapur. Police investigation is underway following a complaint filed by the company owner.