शहरातील प्रमुख रस्ते चकचकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST2021-01-04T04:20:44+5:302021-01-04T04:20:44+5:30

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये दोन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले आहे. या मोहिमेचा हा ८८ ...

The main roads in the city are gleaming | शहरातील प्रमुख रस्ते चकचकीत

शहरातील प्रमुख रस्ते चकचकीत

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये दोन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले आहे. या मोहिमेचा हा ८८ वा रविवार असून, प्रमुख रस्ते, चौक चकचकीत करण्यात आले. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

यावेळी स्वरा फाऊंडेशनच्यावतीने जयंती पंपिंग स्टेशन येथे स्वच्छता करुन वृक्षारोपण करण्यात आले. स्वरा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर, मनपा शाखा अभियंता आर. के. पाटील, उपाध्यक्ष पियुष हुलस्वार, सन्मेश कांबळे, सुनीता मेघानी, उन्मेश कांबळे, अमित देशपांडे, महापालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टसचे पालन करत या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

चौकट

स्वच्छता केलेला परिसर

शाहू नाका ते शिवाजी विद्यापीठ मेन रोड, अंबाई टँक ते पतौडी घाट, गोखले कॉलेज मेन रोड, दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, रमणमळा ते महावीर कॉलेज मेन रोड

महापालिकेची यंत्रणा

दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर, सहा डंपर, सहा आरसी गाड्या, चार औषध फवारणी टँकर, एक पाणी टँकर, १५० स्वच्छता कर्मचारी

फोटो : ०३०१२०२० कोल केएमसी स्वच्छता१

ओळी : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

फोटो : ०३०१२०२० कोल केएमसी स्वच्छता२

ओळी : महापालिकेच्या स्वच्छता अभियानामध्ये वृक्षरोपण मोहीमही राबविण्यात आली.

Web Title: The main roads in the city are gleaming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.