महेंद्र ज्वेलर्सचा ग्रेट ताई पुरस्कार सोहळा शनिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST2021-02-17T04:31:06+5:302021-02-17T04:31:06+5:30

कोल्हापूर : येथील महेंद्र ज्वेलर्सच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून आयोजित केलेल्या ग्रेट ताई पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि.२०) सकाळी १० वाजता ...

Mahendra Jewelers' Great Tai Award Ceremony on Saturday | महेंद्र ज्वेलर्सचा ग्रेट ताई पुरस्कार सोहळा शनिवारी

महेंद्र ज्वेलर्सचा ग्रेट ताई पुरस्कार सोहळा शनिवारी

कोल्हापूर : येथील महेंद्र ज्वेलर्सच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून आयोजित केलेल्या ग्रेट ताई पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि.२०) सकाळी १० वाजता शाह स्मारक भवनात होत आहे. संयोगिताराजे यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण होणार आहे.

पेढीच्या ११६ व्या वर्धापन दिनानिमित्त समाजात कष्टकरी-नोकरदार स्त्रियांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात येणार आहे. ज्या महिला रोज किमान ६० किलोमीटरचा प्रवास करून नोकरी करतात व त्यातून संसाराला हातभार लावतात अशा कष्टाळू माउलींच्या श्रमाचे कौतुक या सोहळ्यात केले जाणार आहे. एरव्ही आपण गल्लीतील दुकानातून किराणा सामान आण म्हटले तरीसुद्धा कपाळावर आठ्या आणतो; परंतु रोज कित्येक मैलाचा प्रवास करायचा, नोकरीतील ताणतणाव सहन करायचे व तेथून घरी आल्यानंतर परत कुटुंबासाठी कष्ट उपसायचे, अशी दिनचर्या करणाऱ्या या महिलांच्या घामाला सलाम करणारा हा सोहळा आहे.

Web Title: Mahendra Jewelers' Great Tai Award Ceremony on Saturday