शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'महाविकास आघाडीचं १५० जागांवर एकमत'; सतेज पाटील यांची माहिती, मुख्यमंत्रीपदाबाबतही केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 15:18 IST

Maharashtra Politics : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत.

Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. दरम्यान, आता यावर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी महाविकास आघाडीमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सांगितले असून १५० जागांवर एकमत झाल्याचेही पाटील म्हणाले. 

आमदार सतेज पाटील यांनी आज एबीपी माझा वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी पाटील म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला समोर जात आहे. तिनही पक्ष मिळून आता १५० जागांवर एकमत झाले आहे. आता राहिलेल्या जागांवर ३० आणि १ तारखेला एकमत होईल. चांगलं सरकार यावं ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. महाविकास आघाडीचं यावं, ते करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, असंही आमदार सतेज पाटील म्हणाले. 

Defamation case: "विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं", निकालावर संजय राऊत काय बोलले?

"महाविकास आघाडी ही मोठा भाऊ म्हणून महाराष्ट्रातील जनतेत काम करणार आहे. आमच्यात मोठा, बारका हा वाद न करता आम्ही काम करणार आहे. मागच्यावेळी एक वेगळी परिस्थिती होती तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद दिले. आता आमच्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी कोणताही वाद नाही. महाविकास आघाडी तुम्हाला कोल्हापुरात स्टॅॉग दिसेल, तसंच राज्यातही दिसेल, असा विश्वासही सतेज पाटील यांनी व्यक्त केला. 

महाविकास आघाडीची ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबरला जागा वाटपासाठी बैठक

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्वाची बैठक ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तेव्हा घटक पक्षातील कोणी विधानसभेच्या कुठल्याही जागेवर दावा केला, तरी याचा अंतिम निर्णय हा तिन्ही पक्षांच्या एकत्रित होणाऱ्या बैठकीनंतरच जाहीर केला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील स्वा. सावरकर मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेआधी पवार यांनी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले,  उमेदवारीची इच्छा असणे स्वाभाविक आहे. परंतु हा निर्णय एका पक्षाचा राहिलेला नाही. तो महाविकास आघाडीचा निर्णय असून तो एकत्रित घेतला जाणार आहे. त्यामुळे यासंदर्भातील आता होणारे दावे निरर्थक आहेत. जर का कोणी उमेदवारीचा आताच दावा करत असेल, तर त्यांच्या बाबतीत 'बाजार तुरी आणि कोण कोणाला मारी', असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागेल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी