शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीचं एकमत; 'महायुती'चं आज नेते ठरविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:28 IST

आबिटकर, मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांची होणार बैठक, क्षीरसागर, महाडिक यांचीही उपस्थिती

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शेकापसह डाव्या पक्षांनी एकीची वज्रमूठ केली असून उद्धवसेना व राष्ट्रवादीने त्यांच्या जागांची अपेक्षा काँग्रेसला कळवली आहे. त्यानुसार आज, शुक्रवारी या तिन्ही प्रमुख पक्षांसह डाव्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरवण्यात येणार आहे.तर, महायुतीच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवारी दुपारी बैठक होणार आहे. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तुटेपर्यंत ताणू नये, अशी महायुतीच्या नेत्यांची भूमिकामहायुती ही निवडणूक एकत्रित लढणार हे निश्चित झाले आहे. नागपूरमध्ये हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा केली, तर पाटील यांनी गेल्याच आठवड्यात आमदार क्षीरसागर यांच्यासोबतही चर्चा केली आहे. अशातच सोमवारी मुश्रीफ यांनी क्षीरसागर यांच्यासोबत विविध विकासकामांचा प्रारंभ केला आहे. त्यामुळे औपचारिक, अनौपचारिक सर्व चर्चा झाल्या असून, त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आजपर्यंतच्या चर्चेत पालकमंत्री आबिटकर हे थेटपणे नव्हते; परंतु तेदेखील या बैठकीत सहभागी होणार असून निश्चित फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे.नागपूर येथील बैठकीवेळी मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली असली तरी त्यावेळी राजस्थानला गेलेले आमदार क्षीरसागर अनुपस्थित होते. त्यांनीच कोल्हापूर महापालिकेसाठी प्रामुख्याने जोडण्या घातल्या असल्याने त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला महत्त्व आहे.नाराजी दूर करावी लागणारमहापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याचा निर्धार तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. जागावाटपात आग्रही राहा; परंतू महायुती तुटेपर्यंत ताणून धरले जाऊ नये अशीच नेत्यांची भूमिका आहे. जरी काही उमेदवार तिकीट मिळाले नाही आणि नाराज झाले तर त्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी नेत्यांनी घेतली आहे. अपवादात्मक प्रकरणात मैत्रीपूर्ण लढत करायची की नाही हे अजून ठरलेले नाही. सध्या तरी महायुती म्हणून सगळे लढणार आहेत.शिंदेसेनेच्या १८० जणांनी नेले अर्जशिंदेसेनेच्या १८० इच्छुकांनी गेल्या दोन दिवसांत संपर्क कार्यालयातून अर्ज नेले आहेत. तर ३९ जणांनी अर्ज पुन्हा जमा केले आहेत. उमेदवारांच्या उद्या शनिवारी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

उद्धवसेनेचा ३३, राष्ट्रवादीचा ३५ जागांचा काँग्रेसला प्रस्तावकोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. काही जागांवर एकमत झाले असून, काही जागांबाबत अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या जागांवर तोडगा काढत आज जागावाटपाचा अंतिम फाॅर्म्युला ठरवण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीतील एका प्रमुख पदाधिकाऱ्याने दिली. उद्धवसेनेचा ३३ जागांचा तर राष्ट्रवादीचा ३५ जागांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला आहे.महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. आघाडीतील घटक पक्षांना किती जागा हव्यात, कोणत्या प्रभागात ताकद किती यासह घटक पक्षांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी काँग्रेसने समिती नेमली होती. या समितीने उद्धवसेनेसह राष्ट्रवादी व इतर डाव्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्याचा अहवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांना दोन दिवसांपूर्वी दिला आहे.उद्धवसेना, राष्ट्रवादीला किती जागा ?महाविकास आघाडीत उद्धवसेनेने ३३ जागांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला असून राष्ट्रवादीने ३५ जागांची अपेक्षा प्रस्तावात ठेवली आहे. या दोन्ही पक्षांच्या अपेक्षांवर प्राथमिक चर्चा करून अंतिमत: किती जागा द्यायच्या यावर आज शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

काँग्रेस-उद्धवसेनेतील चर्चा सकारात्मक दिशेनेआघाडीत उद्धवसेना व काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी अंतर्गत सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चांना सकारात्मक दिशा मिळाली आहे. ही चर्चा सध्या अंतिम टप्प्यात असून, येत्या एक-दोन दिवसांत जागावाटपाचा प्रश्न पूर्णतः निकाली निघेल, असे उद्धवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी सांगितले.

महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही महापालिकेची निवडणूक लढवणार आहोत. राष्ट्रवादीने ३५ जागांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला आहे. आज किंवा उद्या फाॅर्म्युला ठरेल. -आर. के. पोवार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट. कोल्हापूरआम्ही ३३ जागांची मागणी केली असून यातील २० जागांवर आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे या जागा आम्हाला मिळाव्यातच ही आग्रही मागणी आहे. आघाडीतील चर्चा सकारात्मक दिशेने होत असून अंतिम निर्णय संपर्कप्रमुख घेतील. -रविकिरण इंगवले, जिल्हाप्रमुख उद्धवसेना, कोल्हापूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Election: Alliances Negotiate Seats for 2026 Battle.

Web Summary : Kolhapur's political alliances gear up for the 2026 municipal election. Mahavikas Aghadi finalizes seat sharing. Mahayuti leaders meet to decide strategy, aiming for a united front, resolving disagreements.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण