शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election: महाविकास आघाडीत एकमत, महायुतीत सस्पेन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:45 IST

युतीकडे इच्छुकांची भाऊगर्दी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एकत्र लढण्यावर महाविकास आघाडीत एकमत झाले असले तरी महायुतीत मात्र असूनही सस्पेन्स कायम आहे. नगरपालिका निवडणुकीतील विचित्र आघाड्यांनी पक्ष नेते दुखावल्याने तसेच एकमेकांना शह देण्याचे कारस्थाने घडल्याने महायुतीत अस्वस्थता आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना त्यांच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने स्वतंत्र लढून नंतर एकत्र येऊ, असा विचार पुढे येऊ लागला आहे.काँग्रेस, भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, आम आदमी पक्ष, मनसे असे सात प्रमुख पक्ष महापालिकेची निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. परंतु महापालिकेच्या सर्वच्या सर्व ८१ जागा लढविण्याची ताकद कोणत्याही एका पक्षात नाही. त्यामुळे कोणाशी तरी आघाडी, युती करावी लागणार आहे. परंतु ही प्रक्रिया महाविकास आघाडीत शक्य आहे. महायुतीत शक्य होईल असे दिसत नाही. कारण देशात, राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षांकडे स्थानिक पातळीवरील निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त असते. तशी ती या निवडणुकीतही असल्याचे पहायला मिळत आहे.महापालिकेची निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपली आहे, आठ-दहा दिवसात निवडणूक जाहीर होईल, अशी परिस्थिती आहे. तरीसुद्धा सत्तेतील या तिन्ही पक्षात अद्यापही सुसंवाद, समन्वय साधला गेलेला नाही. प्रत्येक पक्षाने आपल्या आपल्या प्रमुखांवर जबाबदाऱ्या टाकल्या आहेत, परंतु युती करण्याच्या दृष्टीने समन्वयक नेमलेले नाहीत. किंवा जबाबदाऱ्याही निश्चित केलेल्या नाहीत. त्यामुळे चर्चेची, संवादाची सुरुवात झालेली पहायला मिळत नाही.महाविकास आघाडीची एकहाती सगळी जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्यावर आहे. उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते सतेज पाटील ठरवतील तीच भूमिका असेल असे सांगत आहेत. कारण त्यांची २० ते २२ जागांपेक्षा जास्त जागांची अपेक्षा नाही. काँग्रेसकडे मात्र ४० हून अधिक उमेदवारांची यादी तयार आहे. यातील बहुतांशी उमेदवार मागच्या काही निवडणुकीत निवडून आलेले आहेत. काही उमेदवार दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले आहेत. किती जागा पाहिजेत यावर वाद न घालता ज्या मिळतील त्या ताकदीने लढविण्याची मानसिकता तिन्ही पक्षांची आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील उद्या कोल्हापुरातभाजपची प्रमुख जबाबदारी असलेले मंत्री चंद्रकांत पाटील उद्या, शनिवारी कोल्हापूर येत असून निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव यांच्याशी चर्चा करणार आहेत. महायुती म्हणून लढायचे की स्वतंत्र हे मंत्री पाटील हेच सांगतील, असे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

महायुतीत रस्सीखेच जोरातमहायुतीत सहभागी असलेल्या तिन्ही पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. भाजपपेक्षा शिंदे सेनेने जास्त आक्रमकपणे तयारी सुरू केली आहे. मागच्या सभागृहात भाजपपेक्षा राष्ट्रवादीने जास्त जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे अपेक्षा जास्त आणि जागा कमी यातून महायुतीचे गणित जुळवताना कठीण जाणार आहे. जागा वाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Elections: Alliance unity, ruling coalition suspense continues.

Web Summary : Kolhapur's municipal elections see Maha Vikas Aghadi united, while the ruling coalition faces internal strife over seat sharing. High candidate numbers and lack of coordination add to the uncertainty, with BJP's Chandrakant Patil set to address the situation.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण