शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Maharashtra Vidhan Sabha 2019 :  डी. वाय. पाटील यांच्या नातवाकडे तब्बल ३४ कोटीची  संपत्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 17:51 IST

माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचे विद्ममान आमदार अमल महाडिक यांच्याविरोधात निवडणूक लढवित आहेत. अवघ्या २९ वर्षांच्या पाटील यांची संपत्ती तब्बल ३४ कोटी ३५ लाख ६५ हजार ४३७ रुपयांची असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

ठळक मुद्दे डी. वाय. पाटील यांच्या नातवाकडे तब्बल ३४ कोटीची संपत्ती कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर भरला अर्ज

कोल्हापूर : माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणविधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचे विद्ममान आमदार अमल महाडिक यांच्याविरोधात निवडणूक लढवित आहेत. अवघ्या २९ वर्षांच्या पाटील यांची संपत्ती तब्बल ३४ कोटी ३५ लाख ६५ हजार ४३७ रुपयांची असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.ऋतुराज पाटील यांनी आज, गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. ऋतुराज विवाहित आहेत. त्यांच्याकडे ४ लाख १ हजार ३२0 रुपयांंची दुकाटी बाईक आहे. त्यांच्याकडील पोर्शे कारची किंमत तब्बल २ कोटी ६२ लाख ३३ हजार २५७ इतकी तर फोर्डची किंमत २७ लाख रुपये आहे. ऋतुराज यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. जमीन जुमला, ठेवी, गाड्या, दागदागिने अशी कोट्यवधीची संपत्ती ऋतुराज पाटील यांच्या नावे आहे.ऋतुराज यांच्याकडे असलेल्या सुझुकी बाईकची किंमत ५५ हजार ७८७ इतकी आहे.याशिवाय ४ लाख ६५ हजार १३१ रुपयांचे सोन्याचे दागिने, ४ लाख ६0 हजार ६३५ रुपयांचे हिरे, शेतजमीन, घर, बंगला मिळून एकुण ११ कोटी ४७ लाख ७ हजार २९७ रुपयांची मालमत्ता आहे. याशिवाय हॉटेल सयाजीची ११ लाख ६४ हजार ८४0, डी वाय पी हॉस्पिटलची ४२ लाख ७२ हजार, गजानन अग्रो फार्मरचे १३ कोटी ९५ लाख २७ हजार ९९९, भाऊ पृथ्वीराज पाटील यांना दिलेले १ कोटी ७२ लाख ६0 हजार इतकी संपत्ती आहे. याशिवाय ठेवी, रोख रक्कम, शेअर्सच्या माध्यमातून २२ कोटी ८८ लाख ५८ हजार १४0, अशी मिळून एकूण ३४ कोटी ३५ लाख ६५ हजार ४३७ रुपयांची संपत्ती ऋतुराज पाटील यांच्याकडे असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणvidhan sabhaविधानसभाSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील