राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र उपविजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST2021-02-05T07:14:01+5:302021-02-05T07:14:01+5:30
कोल्हापूर : इंडियन कौन्सिल फॉर स्पोर्टस् ॲंड एज्युकेशन संस्थेच्या वतीने धसौला (हरयाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ ...

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र उपविजेता
कोल्हापूर : इंडियन कौन्सिल फॉर स्पोर्टस् ॲंड एज्युकेशन संस्थेच्या वतीने धसौला (हरयाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपविजेता ठरला. खुला गटात सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर १९ वर्षांखालील वयोगटात सुवर्ण, १७ वर्षांखालील गटात कांस्यपदक, तर ॲथलेटिक गटात सात सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदकांची कमाई केली. बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक घेत संपूर्ण स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. खेळाडूंना इंडियन कौन्सिल फॉर स्पोर्टस् ॲंड एज्युकेशन संस्थेचे महाराष्ट्र सचिव पद्मजा घारगे -देशमुख, जनमेजयराजे घारगे, क्रीडा प्रशिक्षक कपिल मेटकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजेत्या खेळाडूंसाठी दहा दिवसांचे निवासी क्रीडा प्रशिक्षण शिबिर कोल्हापुरात आयोजित केले आहे.
फोटो ओळी : इंडियन कौन्सिल फॉर स्पोर्टस् ॲंड एज्युकेशन संस्थेच्या वतीने धसौला (हरयाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या महाराष्ट्र संघातील खेळाडू. (फोटो-०२०२२०२१-कोल-इंडियन कौन्सिल)