शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र-कर्नाटकची कोगनोळी टोल नाक्यापर्यंत वाहतूक, महाराष्ट्र एसटीच्या चालकाला कर्नाटकात फासले होते काळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:20 IST

प्रवाशांना दिलासा, कोल्हापुरातून २० हून अधिक फे-या

कोल्हापूर : प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आंतरराज्य सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यापर्यंत दोन्ही राज्यांकडून प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांची संख्या पाहून दिवसभरात मध्यवर्ती बसस्थानकातून २० हून अधिक फे-या झाल्या. कोगनोळी टोल नाक्यापासून पुढील प्रवासासाठी कर्नाटकाकडे प्रवासी जात आहेत.चित्रदुर्ग (कर्नाटक) येथे महाराष्ट्र एसटीच्या चालक, वाहकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासून कोल्हापूर विभागातून कर्नाटकात जाणाऱ्या महाराष्ट्राची एसटी सेवा बंद झाली. त्यामुळे कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.त्या पार्श्वभूमीवर सोमवारी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिका-यांनी विभागीय कार्यालयातील अधिका-यांची भेट घेतली. विद्यार्थी, नोकरदारांनी या मार्गावरील प्रवासी सेवा सुरू करावी, अशी मागणी एसटीकडे केली होती. त्यांचे हाल होऊ नये म्हणून कोल्हापूर आगाराच्या एसटी कोगनोळी टोल नाक्यापर्यंत धावत आहेत. तेथून कर्नाटकच्या एसटी पुढील मार्गासाठी तैनात ठेवल्या आहेत. त्यामुळे निपाणी, बेळगाव, हुबळी, बंगळुरू, सौंदत्ती, गंगावती, रामदुर्ग, धारवाड, दावणगिरी, शिमोगा या मार्गावर जाणा-या प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला.रोज शिक्षण आणि नोकरीनिमित्त कोल्हापुरात येणा-यांना कोगनोळी टोल नाका ते मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत महाराष्ट्र एसटीने सुविधा केली. निपाणी वगळून सेनापती कापशी, माद्याळ, तमनाकवाडा मार्गे आजरा, चंदगड मार्गाकडे वाहतूक सुरू आहे. सोमवारी बसस्थानकात प्रवाशांची तुरळक गर्दी होती. प्रवाशांची गर्दी पाहून एसटी सोडली जात होती. बंदचा फायदा वडाप आणि खासगी ट्रॅव्हल्सधारक घेत आहेत. तत्काळ प्रवासासाठी प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने दर आकारणी केल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसला.

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी अनिश्चित कालावधीसाठी रद्द केल्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येत नाहीत, तोपर्यंत थेट कर्नाटकात एसटी सेवा सुरू केली जाणार नाही. - मल्लेश विभूते, स्थानक प्रमुख

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकtollplazaटोलनाका