शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

महामेळाव्यासाठी महाविकास आघाडीचे नेते बेळगावच्या दिशेने रवाना, कोगनोळी टोलनाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 12:22 IST

मेळावा उधळवण्यासाठी समिती नेते, कार्यकर्त्यांची धरपकड

कोल्हापूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण बनले आहे. यातच आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होत आहे. शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी कोल्हापुरातून महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते रवाना झाले आहेत.

कोगनोळी टोलनाक्यावर मराठी बांधवांची मोठी गर्दी झाली आहे. कर्नाटकात जाण्यास महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. मात्र टोलनाक्यावर पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावेळी कर्नाटकात प्रवेश करत असताना मराठी बांधवांची कर्नाटक पोलिसांशी झटापट झाली.दरम्यान आजच कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे या महामेळाव्याला कर्नाटकने अचानक परवानगी नाकारली आहे. बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील नेते बेळगावला जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. मेळावा उधळवण्यासाठी समिती नेते, कार्यकर्त्यांची धरपकडकर्नाटक पोलिसांनी डेपो मैदानाच्या ठिकाणी समिती नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केल्यामुळे मराठी भाषिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होऊ नये यासाठी समिती नेते मंडळींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एपीएमसी पोलीस ठाण्यात त्यांना स्थानबद्ध केले आहे. सीमा भागात २१ ठिकाणी तपासणी नाके सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सीमा भागात विविध २१  ठिकाणी तपासणी नाके (चेक पोस्ट) उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह एकूण २३० पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकंदर या अधिवेशनासाठी ५००० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी