शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Karnataka Border Dispute: मराठी बांधवांचा मेळावा उधळवण्यासाठी समिती नेते, कार्यकर्त्यांची धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 12:02 IST

मैदान सील, सर्व रस्ते बॅरिकेड्स टाकून बंद 

प्रकाश बेळगोजीबेळगाव: महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आज सोमवारी सकाळी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उपस्थित राहण्यास महाराष्ट्रातील नेत्यांना मज्जाव करण्याबरोबरच ऐनवेळी या मेळाव्याची परवानगी रद्द करून आज सकाळी पोलिसांनी डेपो मैदानाच्या ठिकाणी समिती नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केल्यामुळे मराठी भाषिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होऊ नये यासाठी समिती नेते मंडळींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एपीएमसी पोलीस ठाण्यात त्यांना स्थानबद्ध केले आहे. व्हॅक्सिन डेपो मैदानाच्या ठिकाणी आज सकाळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर आणि काही समिती कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

किणेकर यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तथापि त्यांचे ऐकून न घेता पोलीस अधिकारी नेत्यांना पोलीस व्हॅनमध्ये घालून एपीएमसी पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना केले. त्यावेळी पोलिसांच्या ताब्यात जात असताना मनोहर किनेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेळगाव कारवार बिदर भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे आदी घोषणा देऊन आपला निषेध केला. मैदान सील, सर्व रस्ते बॅरिकेड्स टाकून बंद महामेळाव्यासाठी येणाऱ्या समितीचे नेते व कार्यकर्त्यांना एपीएमसी पोलीस ठाण्याशेजारी जे सभाभवन आहे. त्या ठिकाणी स्थानबद्धतेत ठेवले जात आहे. दरम्यान व्हॅक्सिन डेपो मैदानाच्या चारी बाजूने सील बंद करण्यात आल्या असून या परिसरात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मैदानाच्या ठिकाणी जाण्यास कोणालाही परवानगी दिली जात नाही आहे. मैदानाच्या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स टाकून बंद करण्यात आले आहेत. मैदानाच्या ठिकाणी फक्त प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांना प्रवेश दिला जात असून मेळाव्यासाठी येणाऱ्या समिती कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या दिशेने केली जात आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा प्रकट करण्यासाठी तसेच कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव येथे दरवर्षी मेळावा होतो. त्यानुसार यंदाही हा मेळावा आज सोमवारी सकाळी टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर होणार होता. त्याची संपूर्ण तयारी ही झाली होती. या मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिल्याचं एकीकरण समितीने सांगितला होतं. मात्र अचानक ती परवानगी रद्द करण्यात आली असून डेपो मैदान परिसरात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एडीजीपी अलोक कुमार यांनी आज सकाळी व्हॅक्सिन डेपो मैदानाला भेट देऊन पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली. शहराचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी मेळाव्याला परवानगी नसल्याचे आणि मैदान परिसरात जमाबंदी लागू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चार पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. या मेळाव्याला परवानगी दिली नव्हती असं पोलिसांचं म्हणणं आहे मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीने ही मराठी भाषिकांची गळचेपी असल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक