शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांना कोगनोळीजवळ घेतले ताब्यात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 19:54 IST

महाराष्ट्र-कर्नाटकात तणावपुर्ण परिस्थिती

बाबासो हळिज्वाळे

कोगनोळी : महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर कन्नड रक्षण वेदीकेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या बसेस, ट्रक फोडल्याने राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केला आहे. अशातच, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जर परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर आपण स्वत: बेळगावमध्ये जाऊ असा इशारा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सद्या महाराष्ट्र-कर्नाटकात तणावपुर्ण परिस्थिती आहे.दरम्यान या तणावपुर्ण वातावरणातच शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे व संजय पवार यांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. कोगनोळी येथील दूधगंगा नदी जवळ देवणे यांनी पळत जाऊन कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी रोखून धरले व ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. तर बांगड्यांचा आहेर देऊन निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेस पोलीस छावणीचे स्वरूप महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराष्ट्र पोलिसांकडून दोन पोलीस उपाधीक्षक, चार निरीक्षकांसह जवळपास शंभर पोलिसांचा फौजफाटा तर कर्नाटक पोलिसांकडून जिल्हा पोलीस प्रमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, तीन उपाधीक्षक, बारा निरीक्षक ३० उपनिरीक्षकांसह जवळपास ५०० पोलिसांचा ताफा तैनात केला आहे. त्यामुळे दूधगंगा नदीस पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी सीमा भाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई यांनी दोन वेळा बेळगाव दौरा आयोजित केला पण ते एकदाही बेळगावला गेले नाहीत. दोन्ही वेळी त्यांनी दौरा रद्द केला. समन्वय मंत्री प्रथमच बेळगाव दौरा करत असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीने पूर्ण तयारी केली होती. परंतु दौरा रद्द झाल्याने सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी पसरली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकPoliceपोलिसShiv Senaशिवसेना