राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:25 IST2021-04-01T04:25:00+5:302021-04-01T04:25:00+5:30

कोल्हापूर : डेरवण (ता.चिपळूण, रत्नागिरी) येथे झालेल्या राज्यस्तरीय सतरा वर्षांखालील फुटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलने सानपाडा फुटबाॅल क्लब (मुंबई) चा ...

Maharashtra High School wins state level competition | राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलला विजेतेपद

राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलला विजेतेपद

कोल्हापूर : डेरवण (ता.चिपळूण, रत्नागिरी) येथे झालेल्या राज्यस्तरीय सतरा वर्षांखालील फुटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलने सानपाडा फुटबाॅल क्लब (मुंबई) चा ३-० असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

एसव्हीजेसीटीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विजेत्या महाराष्ट्र हायस्कूल संघात रोहित देसाई, संकेत मेढे, संकेत जाधव, प्रथमेश बाटे, दर्शन पाटील, श्रवण नलवडे, संकेत कांबळे, अजिंक्य काळे, अथर्व मोरे, शाहिद महालकरी, आदित्य लायकर, संदीप आडनाईक, गुरुराज काटकर, स्वयंम साळोखे, सोहम निकम, अथर्व दिघे, यश यडरू यांचा समावेश आहे. या संघाला प्राचार्य ए.एस.रामाणे, उपप्राचार्य यु.आर.आतकिरे, क्रीडा विभागप्रमुख एस.एस.मोरे, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, संतोष पोवार, शरद मेढे, सूर्यजित घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो : ३१०३२०२१-कोल-महाराष्ट्र

आेळी : डेरवण (ता.चिपळूण ) येथे झालेल्या सतरा वर्षांखालील फुटबाॅल स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेल्या महाराष्ट्र हायस्कूलच्या संघासोबत प्रशिक्षक प्रदीप साळोखे व अन्य प्रशिक्षक उपस्थित होते.

Web Title: Maharashtra High School wins state level competition