शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Rain: कोल्हापूर -सांगली महामार्गावरील वाहतूक बंद; हेरले येथील देसाई मळ्याजवळ पुराचे पाणी भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 19:12 IST

Flood on Kolhapur-Sangali Highway: कोल्हापूर -सांगली महामार्गावर हेरले येथील देसाई मळ्याजवल पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद

लोकमत न्यूज नेटवर्क- सुरज पाटीलहेरले : कोल्हापूर -सांगली महामार्गावर हेरले येथील देसाई मळ्याजवल पुराचे पाणी आल्याने ६ वाजता रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. हेरले येथील देसाई मळ्याजवळील घरामध्ये पुराचे पाणी आले आहे. महामार्गावर दुपारी  ४:३०  च्या दरम्यान पाणी येण्यास सुरुवात झाली. (Kolhapur-Sangali Highway closed due to flooded water.)

२००५ व २०१९  साली जेथून पाणी आले होते त्या ठिकाण्यावरूनच दुपारी ४:३० च्या दरम्यान सांगली वरून कोल्हापूर च्या दिशेने येणाऱ्या महामार्गावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.पाणी पातळी वाढत असून २००५ व २०१९   पेक्षा पाण्याचा जोर  जास्त आहे.

हेरले जवळील देसाई मळयानजीक रस्त्यावर ओढ्यातील पुराचे पाणी वाढून ते रस्त्यावर तीन फुटापर्यत आल्याने रस्त्यावरील सर्व वाहतूक ६ च्या बंद करण्यात आली आहे.     हेरले परिसरातील कामगार, नोकर, मजुर , टेक्निशयन यांना कामावरून घरी येण्यासाठी लगबग सुरू आहे.  पुराचे  पाणी येथ आल्याने परिसरातील लोक पाणी पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी करीत आहेत. तीन फुट खोल पाण्याची पातळी आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पाणी वाढण्याची शक्यता आहे. या पाण्यात तरूणाईची हुल्लडबाजी सुरु आहे .कोरोना मुळे शाळांना सुट्टी असल्याने मुलांची  पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. या दंगा मस्तीमध्ये पाण्यामध्ये वाहून जाण्याची अथवा बुडण्याची  शक्यतः असल्याने हातकणंगले पोलीसांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीfloodपूरRainपाऊस