शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. रस्त्यांवर धावली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:31 IST

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे राज्य परिवहन महामंडळातील कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. गुरुवारी रस्त्यावर धावली नाही. एस.टी.च्या इतिहासामध्ये प्रथमच आंदोलन काळात एस.टीची वाहतूक पूर्णपणे बंद होती. यासह रिक्षा, केएमटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प होती.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागातील एकही एस.टी. रस्त्यांवर धावली नाहीइतिहासात प्रथमच पूर्णपणे वाहतूक बंद

कोल्हापूर : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे राज्य परिवहन महामंडळातील कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. गुरुवारी रस्त्यावर धावली नाही. एस.टी.च्या इतिहासामध्ये प्रथमच आंदोलन काळात एस.टीची वाहतूक पूर्णपणे बंद होती. यासह रिक्षा, केएमटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प होती.कोणत्याही ‘बंद’ काळात मुख्यकरून एस.टी.ची तोडफोड व जाळपोळ केली जाते. त्यामुळे एस.टी.चे मोठे नुकसान होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव महामंडळाच्यावतीने कोल्हापूर विभागातील सर्व वाहतूक रात्री बारानंतर पूर्णपणे बंद ठेवत प्रत्येक आगारात गाडी लावण्याबाबत चालक - वाहकांना सूचना देण्यात आल्या होत्या.

गुरुवारी दिवसभर सुरक्षिततेच्या कारणास्तव बसस्थानक व विभागीय कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद ठेवले. ‘बंद’ची माहिती अनेकांना असल्याने प्रवाशी वर्गाने गुरुवारी प्रवास करणे टाळल्याने नेहमी गजबजलेले मध्यवर्ती बसस्थानक, तसेच संभाजीनगर व रंकाळा बसस्थानकांवर दिवसभर शुकशुकाट होता.|रिक्षाचालकांनी स्वत:हून ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे सांयकाळपर्यंत एकही रिक्षा रस्त्यावर नव्हती; त्यामुळे लक्ष्मीपुरी, राजारामपुरी येथील प्रमुख व्यापारी पेठा, महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, शिवाजी रोड, ताराबाई रोड, रंकाळावेश, बिंदू चौक, राजारामपुरी मुख्य रस्ता, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरातील रिक्षा स्टॉप मोकळे पडले होते. ‘के.एम.टी.’ने ‘बंद’मध्ये सहभागी सर्व बससेवा बंद ठेवली होती.

९३४ एस.टीं.ना ब्रेकराज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील सर्व आगारांतील ९३४ गाड्यांची वाहतूक पूर्ण बंद असल्याने विभागाचे सुमारे ७५ लाखांचे उत्पन्न बुडाले, तर दोन लाख ६० हजार किलोमीटर वाहतूक रद्द करण्यात आली.

पर्यंटकांचे हालरेल्वेने कोल्हापुरात आलेले काही पर्यटक व देवदर्शनासाठी आलेल्या नागरिकांना मात्र, एस.टी., रिक्षा व के.एम.टी. बंदचा फटका बसला. त्याना नियोजितस्थळी जाण्यासाठी पायपीट करतच जावे लागेल.

रेल्वेची वाहतूक सुरळीतरेल्वेची वाहतूक सुरळीत झाली. मात्र, प्रवाशी संख्या कमी होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. 

 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदkolhapurकोल्हापूर