शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात गेल्या सात दिवसांत काय घडले..वाचा संपुर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 12:44 IST

कोल्हापूर : काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांच्या माघारीकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या असताना अचानक काँग्रेसच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील ...

कोल्हापूर : काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांच्या माघारीकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या असताना अचानक काँग्रेसच्याकोल्हापूर उत्तर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनीच अनपेक्षितपणे लढण्यापूर्वीच निवडणूक रिंगणातून माघार घेऊन सर्वांना धक्का दिला. मधुरिमा यांच्या माघारीवरून खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी उडाली. शाहू छत्रपती आणि आमदार पाटील प्रचंड संतापले होते. ज्या नाट्यमय घडामोडीनंतर मधुरिमांना उमेदवारी देण्यात आली, तशाच नाट्यमय घडामोडीनंतर त्यांना माघारसुद्धा घ्यावी लागल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानिमित्ताने काँग्रेस पक्षातील वादही चव्हाट्यावर आला.कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राजकारणाला सोमवारी अनपेक्षित कलाटणी मिळाली. काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांनी माघार घ्यावी म्हणून सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रयत्न सुरू झाले होते. सकाळी सात वाजता काही माजी नगरसेवक लाटकर यांच्या घरी जाऊन बसले होते. आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी जमायचे ठरले होते. लाटकर यांनी ‘तुम्ही पुढे चला मी अंघोळ करून येतो’ असे सांगून नगरसेवकांना घरातून घालविले. त्यानंतर लाटकर ‘नॉट रिचेबल’ झाले. त्यांची शोधाशोध सुरू झाली. जसं जसा वेळ निघून जाईल तशी काँग्रेस कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली. त्यातच लाटकर माघार घेणार नसतील तर आम्हीच माघार घेऊ, अशी भूमिका खासदार शाहू छत्रपती यांनी घेतली. त्यामुळे आमदार सतेज पाटील व प्रमुख कार्यकर्त्यांची मोठी घालमेल सुरू झाली.दुपारी २ वाजून ५० मिनिटानंतर अतिशय वेगवान घडामोडी घडल्या. लाटकर काही आलेच नाहीत, मात्र मधुरिमाराजे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या. त्या थेट निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गेल्या, तेथून पुन्हा शेजारच्या खोलीत जाऊन बसल्या. त्याचवेळी काही तरी अघटित घडत असल्याची जाणीव झाली. त्याचवेळी शाहू छत्रपती यांची कार वेगाने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. गाडीतून उतरताच ‘कुठाहेत मोदी, काय झालं, हीच का तुमची लोकशाही. काय झालं लाटकर यांच्या माघारीचे’ अशा शब्दात शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांना शाहू छत्रपती यांनी निवडणूक कार्यालयासमोर झाडले. मालोजीराजे कुठायंत, आत्ता येथे आले होते ना..? अशा शब्दात शाहू छत्रपती मालोजीराजे यांच्यावरदेखील भडकले.

वादावादीनंतर माघार..आमदार पाटील, मालोजीराजे छत्रपती यांचीही वाहने वेगाने तेथे आली. चौघांनी एक खोलीत तीन चार मिनिटे चर्चा झाली. त्या खोलीतून मालोजीराजे यांनी दंडाला धरून मधुरिमांना बाहेर काढले आणि माघार घेण्यास सांगितले. त्यानंतर मधुरिमा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेल्या आणि त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनाही बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. या दहा मिनिटांच्या वेळेत काँग्रेस नेत्यांमध्ये बरीच ताणाताणी झाली. मधुरिमांच्या अनपेक्षित माघारीमुळे काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार कोल्हापूर उत्तरमध्ये असणार नाही.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात गेल्या सात दिवसांत काय घडले२० ऑक्टोबर : काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती, सात जणांनी दिली मुलाखत२७ ऑक्टोबर : राजेश लाटकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर२८ ऑक्टोबर : काँग्रेस कार्यकर्त्यांकडून २७ ऑक्टोबरला पक्ष कार्यालयावर दगडफेक२८ ऑक्टोबर : उमेदवारी बदलण्याची काँग्रेसच्या २७ नगरसेवकांची मागणी२८ ऑक्टोबर : काँग्रेसने उमेदवार बदलला, मधुरिमाराजे यांना उमेदवारी जाहीर२९ ऑक्टोबर : राजेश लाटकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज२९ ऑक्टोबर : मधुरिमाराजे यांनी काँग्रेसकडून भरला अर्ज३१ ऑक्टोबर : काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा शिंदेसेनेत प्रवेश३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर : लाटकर यांचा अर्ज माघारी घेण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न२ नोव्हेंबर : खासदार शाहू छत्रपती, मालोजीराजे, उमेदवार मधुरिमाराजे यांनी लाटकर यांच्या घरी दिली भेट. माघार घेण्याची विनंती४ नोव्हेंबर : लाटकर यांचा अर्ज कायम, काँग्रेसच्या मधुरिमाराजे यांनीच घेतला अर्ज माघारी

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024